होर्मुझवर पुन्हा ताळेबंदी! इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे इराणचा संताप अनावर; जागतिक व्यापाराला दणका
इस्रायलच्या हवाई दलाने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले असून १० मिनिटांत १०० हून अधिक बॉम्बफेक केले आहेत. लेबनीज सिव्हिल डिफेन्सने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हल्ल्यात २५४ लोकांना मृत्यू झाला असून १००० हून अधिक लोक जखमी आहेत.
लेबनॉनची राजधानी बेरुतवरील हल्ल्यात ९१ लोकांचा बळी गेला आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून लोक मलब्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. जागतिक स्तरावर इस्रायल(Israel)च्या या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला जात आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे परंतु लोकांची संख्या जास्त असल्याने सेवांचा पुरवठा कमी पडत आहे.
इराणच्या अटींनुसार, लेबनॉन शस्त्रसंधी कराराचा भागा होता. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी लेबनॉन कोणत्याही कराराचा भाग नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर युद्धविरामाच्या काही तासांच लेबनॉनवर हल्ले झाले आणि संपूर्ण चित्र पालटले.
इस्रायलच्या या कृतीमुळे इराणचा संताप अनावर झाला आहे. इराणने आक्रमक प्रत्युत्तर देत जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाचा असलेला मार्ग स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait Of Hormuz) पुन्हा बंद केला आहे. अनेक तेलवाहू टँकर्सला रोखण्यात आले आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने इशारा दिला आहे की, लेबनॉनवरील हल्ले थांबले नाही तर याचे अमेरिका इस्रायलला गंभीर परिणाम भोगावे लागतील.
दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचा युद्धबंदीचा १० कलमी प्रस्तावाला थेट कचऱ्याच्या टोपलीत टाकले आहे. इराणचा प्रस्ताव गंभीर नसून त्यांनी युरेनियमचा साठा पुर्णपणे बंद करावा अशी मागणी केली आहे.
सध्या अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम करार मोडल्याने जागतिक स्तरावर पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझचा मार्ग बंद केल्याने अनेक तेल आणि गॅसवाहू जहाजे समुद्रात अडकून पडली आहे. यामुळे जागतिक इंधन आणि उर्जा पुरवठा धोक्यात आला आहे. यामुळे जगभरात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
Ans: युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे इराण संतपाला असून प्रत्युत्तरा स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केला आहे.
Ans: इस्रायलच्या हवाई दलाने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले असून १० मिनिटांत १०० हून अधिक बॉम्बफेक केले आहेत.
Ans: लेबनीज सिव्हिल डिफेन्सने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हल्ल्यात २५४ लोकांना मृत्यू झाला असून १००० हून अधिक लोक जखमी आहेत.






