Europe working on plan to replace US in NATO in five to 10 years
सध्या अमेरिकेच्या नाटोतून बाहेर पडण्याची जागतिक स्तरावर चर्चा सुरु आहे. दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरोपमधील देश खंडाचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेची जागा घेणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी युरोपने एक योजना आखली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि नॉर्डिक देश डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड आणि नॉर्वे नाटोच्या व्यवस्थावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे देश डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर या संदर्भात प्रस्ताव देखील मांडणार आहेत. या हस्तांतरणासाठी 5 ते 10 वर्षे लागण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये होणाऱ्या अगामी नार्षिक नाटो शिखर परिषदेत युरोपीय देश अमेरिकेसमोर हा प्रस्ताव मांडणार आहेत. मात्र, इंग्रीजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने नाटोला सोडल्यास युरोपसमोर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे नाटो ने युरोप आणि कॅनडाला शस्त्रास्त्रांच्या साठ्यात 30% टक्के वाढ करण्यास सांगितली आहे. जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांनी त्यांच्या संरक्षण खर्च आणि लष्करी गुंतणुकीत वाढवणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सध्या युरोपमध्ये 80 हजार ते 1 लाखापर्यंत अमेरिकन सैन्य तैनात आहे. अमेरिका नाटोला दरवर्षी 3.5 अब्ज डॉलर्सच्या 15.8% टक्के निधी पुरवतो. मात्र अमेरिका नाटोतून बाहेर पडल्यास युरोपला त्यांच्या संरक्षणासाठी मोठी गुंतवणूक करावी लागले. यामुळे युरोप आपली संरक्षण क्षणता वाढवण्यासाठी हावई संरक्षण प्रणाली, डीप-फायर कॅपेबिलीटी, लॉजिस्टिक्स, संचार आणि भू लष्करी सराव या क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रित केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प नाटोला वेळ आणि पैशांचा अपव्यय मानतात. अमेरिका नाटोतून बाहेर पडल्यानंतर, युरोपियन देशांना त्यांच्या GDP च्या किमान 3% संरक्षण खर्च करावा लागेल. सध्या युरोप आपल्या संरक्षण क्षमतेत, शस्त्रास्त्रे, इंधन भरणारी विमान, कमांड व नियंत्रण प्रणाली, उपग्रह आणि ड्रोन यांची कमतरता भरुन काढण्याच्या प्रयत्नात आहे. अमेरिका नाटोतून बाहेर पडल्यास, युरोपला रशियाच्या आक्रमणाविरुद्ध स्वत:ची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी युरोप तयारीला लागला आहे.
सध्या युरोप सैनिकांची भरती आणि आधुनिक शस्त्रस्त्रांच्या विकासावर भर देत आहे. रशियाच्या अण्वस्त्र सामर्थ्याला तोंड देण्यासाठी युरोपला स्वत:ची ताकद वाढवावी लागेल. युरोपकडे सध्या 500 अण्वस्त्रांचा साठा आहे, तर रशियाकडे 6 हजार अण्वस्त्रांचा साठा आहे. यामुळे युरोपियन देशांना त्यांची अण्वस्त्रांचा साठा भरुन काढत आहे. तसेच नाटोमधील इतर देशांनाही अधिक जबाबदारी घेतली आहे. यामुळे युरोपच्या संरक्षण क्षेत्रात कोमते बदल होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.