अमेरिका नाटोतून बाहेर पडणार? युरोपिय देशांवर काय होईल परिणाम, जाणून घ्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिका नाटो देशातून बाहेर पडू शकतो असे संकेत मिळाले आहेत. हे संकते अशा वेळी आले आहेत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यातील वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प युक्रेनविरोधात कठोर भूमिका घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला मिळणारी अमेरिकेची मदत थांबवली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमध्ये शांततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याच दरम्यान यूरोपिय देशांचे झेलेन्स्कींना पाठिंबा मिळत आहे.
मात्र, अमेरिकेच्या नाटोतून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यामुळे युरोपिय देशाची चिंता वाढली आहे. अमेरिका नाटोतून बाहेर पडल्यास, युरोपला रशियाच्या आक्रमणाविरुद्ध स्वत:ची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या अडचणींना तोडं द्यावे लागेल.
अमेरिकेची मदत थांबली
युक्रेनला मिळणारी लष्करी मदत थांबवणे, ट्रम्प यांच्या रणनितीचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या मते अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेनला रशियाविरुद्ध विजय मिळवणे कठीण आहे. तसेच यामुळे झेलेन्स्की पुन्हा वाटाघाटी करण्यास तयार होतील. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे युक्रेनच्या संरक्षण क्षणतेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
अमेरिका नाटोतून बाहेर पडल्यावर परिणाम होणार
अमेरिका नाटोतून बाहेर पडल्यावर युक्रेनला त्यांच्या संरक्षणासाठी स्वत:वर अवलंबून रहावे लागेल. युरोपला स्वत:च्या सुरक्षेसाठी अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. दोन दिवसांपूर्वी युरोपियन युनियनच्या झालेल्या बैठकीत देखील पोलंडचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी युरोपियन देशांनी त्यांच्या संरक्षण खर्चात वाढची गरज अधोरेखित केली होती.
अमेरिका नाटोसाठी महत्त्वाचा का?
अमेरिका नाटोदेशातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतो. अमेरिकेकडे 4 ट्रिलियन डॉलर्सच्या अत्याधुनिक सुविधा, यामध्ये सैन्य, विमानवाहू नौका, क्षेपमास्त्रे आणि अत्याधुनिक ड्रोन आहेत. मात्र अमेरिका नाटोतून बाहेर पडल्यास युरोपकडे लष्करी बळाची कमतरता नसली तरी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे कमी पडण्याची शक्यता आहे.
युरोपची संरक्षण क्षमता
युरोपियन युनियनकडे 1 लाख 20 हजाराहून अधिक लष्कर बळ आहे, तर रशियाकडे 1 लाख सैन्य बळ आहे. युरोपकडे राखीव सैन्य पाठबळ 1,750,132 तर रशियाकडे 2,000,000 आहे. युरोपकडे 4,377 टॅंकर्स तर रशियाकडे 12 हजार 267 टॅंकर आहे. लढाऊ विमानांमध्ये युरोपची क्षमता 5 हजार 392 विमाने इतकी तर रशियाची 4 हजार 418 आहे. मात्र यामध्ये फ्रान्स आणि ब्रिटन देशांचा युरोपच्या अण्वस्त्रांचा मोठा वाट आहे.
अमेरिका नाटोतून बाहेर पडल्यास युरोपला संरक्षण खर्चात वाढ करावी लागेल. हजारो सैनिकांची भरती करावी लागेल आणि आधुनिक शस्त्रासाठी विकसित करावा लागेल. रशियाच्या अण्वस्त्र सामर्थ्याला तोंड देण्यासाठी युरोपला स्वत:ची ताकद वाढवावी लागेल. तसेच नाटोमधील इतर देशांनाही अधिक जबाबदारी घ्यावी लागले.यामुळे पुढील काळात युरोपच्या संरक्षण धोणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.






