Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेक्सिकोत बस आणि ट्रकचा भीषण अपघात; आगीत 41 जणांचा होरपळून मृत्यू

मेक्सिकोत एक भीषण रस्ता अपघाताची घटना घडली आहे. ताबास्को राज्यात शनिवारी सकाळी (८ फेब्रुवारी) बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या धडकीमुळे बसने पेट घेतला. बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 09, 2025 | 05:04 PM
Fatal accident involving bus and truck in Mexico; 41 people die in fire

Fatal accident involving bus and truck in Mexico; 41 people die in fire

Follow Us
Close
Follow Us:

मेक्सिको: मेक्सिकोत एक भीषण रस्ता अपघाताची घटना घडली आहे. ताबास्को राज्यात शनिवारी सकाळी (८ फेब्रुवारी) बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या धडकीमुळे बसने पेट घेतला आणि बसमधील 48 प्रवासीपैकी 38 जणांचा आणि दोन बस चालकांचा मृत्यू झाला. तसेच ट्रक चालकाचा देखील मृत्यू झाला आहे. बसने त्वरित आग पकडली आणि अनेक प्रवासी जिवंत जळाले गेले आहेत. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, बस पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसत आहे. सुरक्षा एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत फक्त 18 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे. ट्रक आणि बसची धडकी इतकी जबरदस्त होती की, बसने त्वरित पेट घेतला. प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी देखील मिळाली नाही. घटनेनंतर बस पूर्णतः जळून खाक झाली, फक्त लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रक्तासारखी लाल झाली ‘या’ देशातील नदी; लोकांमध्ये भीतीचे वातावरण, काय आहे रहस्य?

TRAGEDY IN MEXICO 🚨🚌 Over 32 killed in bus crash in southern Mexico 🌪️🕊️

The bus was traveling from Cancun to Tabasco with 44 passengers on board 😞 pic.twitter.com/EVjo3LE7kG

— The Viral Videos (@The_viralvideo_) February 9, 2025

सुरक्षा यंत्रणांनी बचावकार्य सुरू केले असून, आत्तापर्यंत केवळ १८ मृतदेहांची ओळख पटली आहे. जळून खाक झालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे कठीण होत आहे, त्यामुळे तपास यंत्रणा डीएनए चाचणीच्या आधारे मृतांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. बचावकार्य अद्याप सुरूच आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बससेवेचे संचालन करणाऱ्या ‘टूर्स एकोस्टा’ कंपनीने या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्यासाठी ते प्रशासनासोबत काम करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

यापूर्वीही झाला होता अपघात

मेक्सिकोत अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मेक्सिकोमध्ये अशा प्रकारचे अपघात सातत्याने घडत आहेत. ऑक्टोबर 2024 मध्येही असाच एक अपघात झाला होता, ज्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला होता. 2020 पासून देशात रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2022 मध्ये अशा घटनांमध्ये 4,803 लोकांचा मृत्य़ू 90 हजार लोक जखमी झाले आहेत.

भारतातही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अशीच एक दुर्घटना घडली होती. दोन ते टॅंकरची जोरदार धडक झाल्याने मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात 40 लोक गंभीररित्या जखमी झाले होता आणि 5 जमांचा जागीच मृत्यू जाला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्पच्या मेहरबानीसाठी पाकिस्तान झाला जागा; उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Web Title: Fatal accident involving bus and truck in mexico 41 people die in fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • Accident News
  • New Mexico
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
4

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.