Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO VIRAL : सोशल मीडियावर #ParisProtests ट्रेंड तीव्र; फ्रान्सच्या रस्त्यांवर सरकारविरोधी रणधुमाळी

France News:फ्रान्समध्ये निदर्शनांदरम्यान पोलिसांनी एका महिलेला लाथ मारली, ज्यामुळे ती खाली पडली. ती उठली तेव्हा पोलिसांनी तिला पुन्हा खाली ढकलले. पोलिसांचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 19, 2025 | 05:00 PM
VIDEO VIRAL: #ParisProtests trending strongly on social media; Anti-government protests on the streets of France

VIDEO VIRAL: #ParisProtests trending strongly on social media; Anti-government protests on the streets of France

Follow Us
Close
Follow Us:
  • पॅरिससह अनेक शहरांत बजेट कपातीविरोधात फ्रान्समध्ये हिंसक निदर्शने, ५ लाखांहून अधिक लोक रस्त्यावर.

  • महिला निदर्शकावर पोलिसांनी लाथ मारून, ढकलून केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • सरकारच्या $५२ अब्ज बजेट कपातीच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांपासून ते कामगार संघटनांपर्यंत प्रचंड असंतोष.

#ParisProtests trending : फ्रान्सची राजधानी पॅरिस आणि इतर प्रमुख शहरांत मागील काही दिवसांपासून प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. सरकारने जाहीर केलेल्या $५२ अब्ज इतक्या प्रचंड बजेट कपातीच्या निर्णयाविरोधात लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या निदर्शनांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली घटना म्हणजे एका महिला निदर्शिकेवर पोलिसांनी केलेली मारहाण. पोलिसांनी त्या महिलेला लाथ मारून खाली पाडले आणि ती उठली तेव्हा पुन्हा तिला ढकलून दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

५ लाखांहून अधिक लोक रस्त्यावर

गुरुवारी कामगार संघटनांच्या पुढाकाराने फ्रान्समध्ये एक भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. अंदाजे ५ लाखांहून अधिक लोकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. पॅरिस, लिओन, नॅन्टेस, मार्सिले, बोर्डो, टूलूस आणि केन यांसारख्या प्रमुख शहरांत मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. काही ठिकाणी महामार्ग रोखण्यात आले, वाहनांची तोडफोड व जाळपोळ घडली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Putin : कोण सांभाळणार रशियन साम्राज्याची कमान? व्लादिमीर पुतिन यांनी जाहीर केली पुढील उत्तराधिकारी पदासाठीची योजना

जनरेशन झेडची मोठ्या प्रमाणात भागीदारी

या आंदोलनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तरुणांचा प्रचंड सहभाग. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने निदर्शनांत भाग घेतला. अनेकांनी सरकारी धोरणांचा निषेध करण्यासाठी रस्त्यांवर टायर पेटवले, महामार्ग अडवले. ही परिस्थिती नेपाळमध्ये अलीकडेच झालेल्या सरकारविरोधी आंदोलनांची आठवण करून देणारी होती.

पोलिसांची ८०,००० जवानांची फौज तैनात

सरकारने आंदोलने आटोक्यात आणण्यासाठी तब्बल ८०,००० सुरक्षा जवानांची तैनाती केली आहे. आतापर्यंत १४१ हून अधिक निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी महिलांवर व तरुणांवर वापरलेल्या बळामुळे जनतेत प्रचंड रोष पसरला आहे.

In France, more than 1 million people took to the streets as part of the”Block everything” protest

300 people were arrested

Teachers, train drivers, pharmacists, and medics declared a strike

Here Police in “Free Europe” kick a young woman along the street. pic.twitter.com/zWi8sM6VYj

— Chay Bowes (@BowesChay) September 18, 2025

credit : social media

सोशल मीडियावर संताप

महिला निदर्शिकेवर पोलिसांनी केलेल्या लाथा व ढकलण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर #JusticeForProtesters, #ParisProtests असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अनेकांनी फ्रेंच पोलिसांची तुलना हुकूमशाही पद्धतींशी केली आहे. लोकांचा प्रश्न एकच – “लोकशाही देशात आंदोलन करण्याचा अधिकार असूनही नागरिकांवर एवढे कठोर दडपण का?”

सरकारची भूमिका

फ्रेंच सरकारने २०२६ साठी जाहीर केलेल्या बजेट कपातीच्या प्रस्तावात पेन्शन गोठवणे, आरोग्य व शिक्षणावरील खर्चात कपात, बेरोजगारी भत्ते कमी करणे आणि दोन राष्ट्रीय सुट्ट्या रद्द करणे यांचा समावेश आहे. सरकारचे म्हणणे आहे की देशाची राजकोषीय तूट युरोपियन युनियनच्या मानकांपेक्षा दुप्पट म्हणजेच ६% पेक्षा जास्त झाली आहे. त्याचबरोबर देशाचे कर्ज जीडीपीच्या तब्बल ११४% पर्यंत पोहोचले आहे.

🚨🇫🇷 Meanwhile in Paris today

Riot Police charge into Far Left Protestors who have vowed to ‘Block Everything’ today.

You are witnessing the collapse of Western Society in real time. pic.twitter.com/v9clq5hce4

— Concerned Citizen (@BGatesIsaPyscho) September 10, 2025

credit : social media

सामान्य नागरिकांचा विरोध

तथापि, सर्वसामान्य नागरिक या निर्णयाकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. लोकांच्या मते सरकार हा संपूर्ण भार सामान्यांवर टाकत असून श्रीमंतांसाठी मात्र सोयी निर्माण करत आहे. महागाईमुळे आधीच जगणे कठीण झाले असताना शिक्षण, आरोग्य व रोजगार क्षेत्रांवरील कपातीमुळे तरुण व कामगार वर्गाचे हाल अधिकच वाढणार आहेत. व्यापारी संघटनांनी सरकारला सुचवले आहे की सामान्यांच्या खर्चावर गदा आणण्याऐवजी श्रीमंतांवर कर वाढवावा.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Geopolitics : पाकिस्तान-सौदी जवळीक जर संरक्षण ढाल; तर India-UAE करार भविष्याच्या गुंतवणुकीची वाटचाल

आंदोलनांचा भविष्यातील प्रभाव

फ्रान्समध्ये सध्या सुरू असलेली ही आंदोलने केवळ आर्थिक मुद्द्यांपुरती मर्यादित नाहीत, तर सामाजिक व राजकीय परिमाणेही त्यातून दिसून येत आहेत. सरकार आणि जनतेतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या घटनाक्रमामुळे फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेलाही तडा जाऊ शकतो, कारण लोकशाहीत नागरिकांच्या आवाजाला दडपण्याऐवजी ऐकले जाणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया

जगभरातील माध्यमांनी या घटनेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली आहे. मानवाधिकार संघटनांनी पोलिसांकडून महिलांवर वापरलेल्या बळाची निंदा केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर सरकारने तातडीने संवाद साधला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते आणि देशाच्या आर्थिक स्थैर्यावरही परिणाम होऊ शकतो.

Web Title: Female protester pushed kicked beaten by police in france video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • France
  • Protester
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

कासवाला पाहताच श्वानाचं पिल्लू झालं खुश, जमिनीवर लोळत केली मजेदार नक्कल; पाहून युजर्सना फुटलं हसू… क्युट Video Viral
1

कासवाला पाहताच श्वानाचं पिल्लू झालं खुश, जमिनीवर लोळत केली मजेदार नक्कल; पाहून युजर्सना फुटलं हसू… क्युट Video Viral

क्षणात पलटला डाव…! सापाच्या हल्ल्यात त्याचीच झाली शिकार, छोट्या प्राण्याने चक्क चावून चावून पाडला फडशा; Video Viral
2

क्षणात पलटला डाव…! सापाच्या हल्ल्यात त्याचीच झाली शिकार, छोट्या प्राण्याने चक्क चावून चावून पाडला फडशा; Video Viral

हुंड्याच्या मागणीला एवढी कंटाळली की थेट छतावरूनच मारली उडी, जिवंत वाचली पण तितक्यात सासरच्यांनी केली बेदम मारहाण; Video Viral
3

हुंड्याच्या मागणीला एवढी कंटाळली की थेट छतावरूनच मारली उडी, जिवंत वाचली पण तितक्यात सासरच्यांनी केली बेदम मारहाण; Video Viral

घड्याळाच्या आत दडलाय खराखुरा व्यक्ती, स्वतःच्या हाताने बदलतो वेळ… पाहून आश्चर्यचकित झाला भारतीय व्यक्ती; Video Viral
4

घड्याळाच्या आत दडलाय खराखुरा व्यक्ती, स्वतःच्या हाताने बदलतो वेळ… पाहून आश्चर्यचकित झाला भारतीय व्यक्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.