
Fire the journalist or we will burn the media house Mohammad Yunus inspires hooliganism
Journalist Naznin Munni threat Bangladesh Global TV : शेजारील देश बांगलादेशातील (Bangladesh) परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे. मोहम्मद युनूस (Mohammed Yunus) यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सत्तेत आल्यापासून देशात कट्टरपंथी गटांची गुंडगिरी शिगेला पोहोचली आहे. आता हे कट्टरपंथी केवळ रस्त्यावर हिंसाचार करत नसून, सत्य मांडणाऱ्या माध्यमांचा आवाजही दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. बांगलादेशातील लोकप्रिय न्यूज अँकर आणि पत्रकार नाजनीन मुन्नी यांना कट्टरपंथीयांनी लक्ष्य केले असून, त्यांच्या मीडिया हाऊसला थेट जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.
२१ डिसेंबर रोजी तेजगाव येथील ‘ग्लोबल टीव्ही’च्या कार्यालयात ७ ते ८ तरुण घुसले. स्वतःला ‘भेदभाव विरोधी विद्यार्थी चळवळी’चे सदस्य म्हणवून घेणाऱ्या या तरुणांनी व्यवस्थापकीय संचालकांकडे नाजनीन मुन्नी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “नाजनीन मुन्नी या अवामी लीगच्या समर्थक आहेत आणि त्यांनी शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येचे योग्य कव्हरेज दिले नाही,” असा अजब आरोप या तरुणांनी केला. जर मुन्नी यांना कामावरून काढले नाही, तर ‘प्रथम आलो’ आणि ‘द डेली स्टार’ प्रमाणेच तुमचेही कार्यालय राख करू, असा इशारा त्यांनी दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vijay Mallya : विजय मल्ल्या म्हणाले, ‘फरार हा शब्द काढून टाका’; मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘आधी भारतात परत या’
विशेष म्हणजे, नाजनीन मुन्नी या त्याच पत्रकार आहेत ज्यांनी गेल्या वर्षीच्या विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने डझनभर टीव्ही शो केले होते. मात्र, आता जेव्हा त्या देशातील वाढत्या कट्टरतावादावर आणि सत्यावर बोलू लागल्या आहेत, तेव्हा त्याच विद्यार्थ्यांच्या नावाने वावरणारे गट त्यांच्या जीवावर उठले आहेत. नाजनीन यांनी फेसबुक पोस्टद्वारे या घटनेची माहिती दिली असून, “मी अशा धमक्यांनी घाबरणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
“They didn’t only want to burn the building, they wanted to murder the staff of Daily Star. We have entered an era of murder. Freedom of expression is a distant dream (in Bangladesh), now the fight to stay alive”@dailystarnews editor Mahfuz Anam’s desperate plea for the… pic.twitter.com/4rNDSqMcz6 — Indrajit Kundu | ইন্দ্রজিৎ (@iindrojit) December 22, 2025
credit : social media and Twitter
ही केवळ एक एकाकी घटना नाही. गेल्या आठवड्यात १८-१९ डिसेंबरच्या रात्री बांगलादेशातील आघाडीची वृत्तपत्रे ‘प्रथम आलो’ आणि ‘द डेली स्टार’ यांच्या कार्यालयांवर हिंसक हल्ले झाले. तिथे मोठी तोडफोड करून आग लावण्यात आली, ज्यामध्ये अनेक पत्रकार आणि कर्मचारी अडकले होते. मोहम्मद युनूस यांच्या प्रशासनाकडून अशा हिंसक गटांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, हे गुंड आता खुलेआम कोणत्याही मीडिया हाऊसला धमकावत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : DOJ Release: Trump-Epsteinचे ‘डार्क’ कनेक्शन; ट्रम्पविरुद्ध महिलांवर अत्याचार अन् ‘Lolita Express’मध्ये प्रवासाचे धक्कादायक पुरावे
मुहम्मद युनूस यांनी सत्तेत येताना लोकशाही आणि शांततेची आश्वासने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या काळात अवामी लीगशी संबंधित असल्याचा संशय आल्यास कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला लक्ष्य केले जात आहे. भेदभाव विरोधी विद्यार्थी चळवळीच्या अध्यक्षांनी या धमक्यांपासून स्वतःला दूर ठेवले असले, तरी जमिनीवर मात्र याच संघटनेच्या नावाने गुंडगिरी सुरू आहे. पत्रकारांना काम करण्यापासून रोखणे आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणे, यामुळे बांगलादेशातील उरलीसुरली लोकशाहीही संपण्याच्या मार्गावर आहे.
Ans: जर पत्रकार नाजनीन मुन्नी यांना कामावरून काढले नाही, तर टीव्ही चॅनेलचे कार्यालय जाळून टाकण्याची धमकी कट्टरपंथीयांनी दिली आहे.
Ans: पत्रकारांवर अवामी लीगचे समर्थक असल्याचा शिक्का मारला जात आहे आणि त्यांनी शरीफ उस्मान हादींच्या मृत्यूचे पुरेसे कव्हरेज दिले नाही असा आरोप केला जात आहे.
Ans: १८-१९ डिसेंबरच्या रात्री बांगलादेशातील प्रसिद्ध माध्यम समूह 'प्रथम आलो' (Prothom Alo) आणि 'द डेली स्टार' (The Daily Star) यांच्या कार्यालयांची तोडफोड करून त्यांना आग लावण्यात आली होती.