
गौटियर म्हणाले की, इतिहासातून हा धडा मिळाला आहे की हिंदूंनी लढायला हवं. आजही जगात सगळीकडे हिंदू धर्मावर आक्रमणं होतायतं.
वॉशिंग्टन: फ्रान्सचे पत्रकार फ्रेंकोइस गौटियर (French Journalist Francois Gautier) यांनी हिंदूंबाबत मोठं भाष्य केलं आहे. फ्रेंकोइस गौटियर यांनी सांगितलं की, हिंदू खूप शांतताप्रिय लोक आहेत. मात्र भारतात (India) ते बहुसंख्यांक असतानाही अल्पसंख्यांकांच्या मानसिकतेने चालतात. त्यांच्यात एकजूट नाही. पुण्यातील ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम ऑफ इंडियन हिस्ट्री’ साठी निधी जमा करण्याच्या निमित्ताने ते अमेरिकेत गेले आहेत. तिथे त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. (Hindu Religion)
गौटियर म्हणाले की, इतिहासातून हा धडा मिळाला आहे की हिंदूंनी लढायला हवं. आजही जगात सगळीकडे हिंदू धर्मावर आक्रमणं होतायतं. पाकिस्तान असो किंवा अफगाणिस्तान किंवा ख्रिश्चन मिशनरींनी केलेलं धर्मांतरण असो, सगळीकडे हे सुरु आहे. भारतात आता दक्षिणेकडच्या भागात आणि पंजाबमध्ये ही समस्या वाढत आहे. केबल टिव्हीमुळे भारतात पाश्चिमात्य देशांचे वारे वाहत आहेत. पाश्चिमात्य देश हिंदूंकडे शत्रू म्हणून बघतात. पाश्चिमात्य देश सांगतात की, हे ते लोक आहेत ज्यांनी सांगितलं की हिंदू कट्टरता तितकीच धोकादायक आहे जितकी मुस्लिम कट्टरता. मात्र हे खोटं आहे कारण हिंदू धर्मातले लोक मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्माप्रमाणे जगावर ताबा मिळवण्यासाठी कधी भारताच्या बाहेर गेले नाही.
गौटियर पुढे म्हणाले की, ख्रिश्चन धर्माने दक्षिण अमेरिकेवर ताबा मिळवला. इतर धर्मांना संपवून टाकलं. इस्लामने इजिप्तमध्ये तिथली संस्कृती संपवली. हिंदू धर्मातल्या लोकांनी कोणावर आपला धर्म लादला नाही. आजही कोणताही हिंदू धर्मांतरण करा, असं म्हणत नाही.
हिंदू आजही घाबरलेले आहेत
गौटियर सांगतात की, हिंदूंना खूप त्रास दिला गेला. त्यांच्यावर खूप आक्रमणे झाली. हिंदूंच्या हत्या केल्या गेल्या. त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले. त्यामुळे हिंदू आजही घाबरलेले असतात. गौटियर संग्रहालय तयार करत आहेत कारण भारतातला खरा धर्म आणि इतिहास लोकांसमोर यावा. संग्रहालय तयार करण्यामागचा तोच उद्देश आहे.
मोदींचं कौतुक
त्यांनी पुढे हिंदू कट्टरतेच्या उदयाच्या आरोपाचंही खंडन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचतायत. हिंदू जगात सगळ्यात जास्त सहिष्णू आहेत. मोदीदेखील मुस्लिम, हिंदू , ख्रिश्चन सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
ते पुढे म्हणाले की, मी शिवाजी महाराजांचा सन्मान करू इच्छितो कारण त्यांच्याकडे असाधारण साहस आणि बुद्धिमत्ता होती. हिंदू जगात बहुसंख्यांक आहेत. हिंदूत्व जगातला तिसरा मोठा धर्म आहे.