फील्ड मार्शल पद, सन्मान की रणनीती?
पाकिस्तानच्या संघीय मंत्रिमंडळाने असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. “ऑपरेशन बन्यानम मार्सूस” मध्ये दाखवलेल्या धाडसामुळे त्यांना हा बहुमान दिला गेला, असा सरकारी दावा आहे. मात्र, भारतीय सैन्याकडून नुकत्याच झालेल्या लष्करी अपयशानंतर, ही बढती जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे तज्ञांचे मत आहे.
पाकिस्तानमध्ये ही फक्त दुसरीच वेळ आहे की कुणाला फील्ड मार्शलचा सन्मान देण्यात आला आहे. यापूर्वी अयुब खान यांनी स्वतःला १९५९ मध्ये ही पदवी बहाल केली होती. त्यामुळे असीम मुनीर यांची ही बढती केवळ लष्करी दृष्टिकोनातून नसून राजकीय हेतू आणि प्रादेशिक समीकरणं बदलण्याचा प्रयत्न आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानपेक्षा वाईट हाल होणार बांगलादेशचे? लष्करप्रमुखांच्या हातात देशाची सूत्र, युनूस हतबल
शाहबाज शरीफ यांचा श्रेयवाद
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही बढती आपला निर्णय असल्याचे ठामपणे सांगितले आहे. सत्ताधारी पक्ष याला मोठा राजकीय मुद्दा बनवून सादर करत आहे. जनतेच्या मनात राष्ट्रवाद जागवण्याचा आणि सरकारचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, लष्करी साखळीमध्ये नेमक्या कोणत्या निकषांवर ही बढती दिली गेली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
On behalf of the entire nation, I extend my heartfelt felicitations to General Syed Asim Munir, NI (M) on his well-deserved promotion to the rank of Field Marshal. His exemplary leadership during Operation Bunyan-um-Marsoos crushed enemy’s nefarious designs and brought great…
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) May 20, 2025
credit : social media
जॉन बोल्टन यांचा चीनबाबत इशारा
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी या निर्णयावर स्पष्ट चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, “असीम मुनीर यांची फील्ड मार्शल पदावर बढती ही चीनसाठी धोरणात्मक संधी ठरू शकते.” चीन सध्या पाकिस्तानमधील लष्करी आणि आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. त्यामुळे अशा उच्च दर्जाच्या नियुक्त्या बीजिंगसाठी रणनीतिक फायदा मिळवून देऊ शकतात. बोल्टन यांनी स्पष्ट केलं की, पाकिस्तान-भारत यांच्यातील तणाव आणि यामध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे देशाच्या आतून असंतोष उभा राहू शकतो. त्यामुळे अशा संवेदनशील नेमणुकीचा विचार geopolitical समजुतीने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सुचवले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकाचा ‘Golden Dome’ कसा ठरू शकतो जागतिक सुरक्षेला नवे आव्हान? वाचा एका क्लीकवर…
लष्करी अपयश झाकण्यासाठी एक प्रयत्न?
पाकिस्तानी लष्कराने अलीकडील काळात भारतीय सैन्याशी झालेल्या संघर्षांमध्ये काही प्रमाणात अपयश अनुभवले आहे, असे गुप्तचर अहवाल सूचित करतात. अशा परिस्थितीत असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती देणे, हे प्रतिमाबांधणीचे राजकीय आणि लष्करी प्रयत्न मानले जात आहेत.
बढतीपेक्षा राजकारण मोठे
असीम मुनीर यांची फील्ड मार्शलपदी बढती सन्मानाची बाब असली, तरी ती पूर्णतः निर्विवाद नाही. शाहबाज शरीफ यांचे श्रेय घेण्याचे प्रयत्न, चीनचा संभाव्य फायदा, आणि अमेरिकेचा इशारा यामुळे ही बढती फक्त लष्करी नसून राजकीय, रणनीतिक आणि आंतरराष्ट्रीय प्रभावाची जटिल गोष्ट बनली आहे. आगामी काळात असीम मुनीर यांच्या भूमिकेकडे आणि पाकिस्तान-चीन संबंधांमध्ये होणाऱ्या बदलांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहील, यात शंका नाही.