Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेतन्याहूंना अरेस्ट वॉरंटनंतर आणखी मोठा झटका; गाझातील 15 इस्त्रायली सैनिकांची हमासकडून हत्या

इस्त्रायल हमास-युद्ध आता वेगळे निर्णायक वळण घेत आहे. हमालसने केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या अल-कसाम ब्रिगेड सैनिकांनी उत्तर गाझातील बाट लाहिया शहरातील इस्त्रायलच्या भूदलाच्या युनिटवर हल्ला केला आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 23, 2024 | 11:34 AM
नेतन्याहूंना अरेस्ट वॉरंटनंतर आणखी मोठा झटका; गाझातील 15 इस्त्रायली सैनिकांची हमासकडून हत्या

नेतन्याहूंना अरेस्ट वॉरंटनंतर आणखी मोठा झटका; गाझातील 15 इस्त्रायली सैनिकांची हमासकडून हत्या

Follow Us
Close
Follow Us:

गाझा: इस्त्रायल हमास-युद्ध आता वेगळे निर्णायक वळण घेत आहे. हमालसने केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या अल-कसाम ब्रिगेड सैनिकांनी उत्तर गाझातील बाट लाहिया शहरातील इस्त्रायलच्या भूदलाच्या युनिटवर हल्ला केला आहेत. हमासने दावा केला आहे की, या हल्ल्यांत 15 इस्त्रायली सैनिकांनी ठार करण्यात आले आहे. तसेच दुसरीकडे इस्त्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांना देखील अटक करण्यात आली आहे. यामुळे इस्त्रायलला मोठा झटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हमासने जबलिया कॅम्पच्या पश्चिमेकडील सफ्तावी भागाजवळ इस्रायलच्या मर्कावा रणगाड्यांवरही हल्ले केले आहेत. दुसरीकडे, इस्लामिक जिहादच्या अल-कुद्स ब्रिगेडनेही मोर्टार हल्ल्यांद्वारे इस्रायली सैनिकांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. मात्र, इस्रायली लष्कराने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

जागतिक  घडामोडी संबंधित बातम्या- पुतिन यांचे रशियाला हायपरसॉनिक मिसाइल उत्पादन करण्याचे आदेश; युक्रेनचे आंतरराष्ट्रीय समुदायाकडे कठोर कारवाईचे आवाहन

पंतप्रधान नेतन्यांहूंना अटक 

दरम्यान, इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासाठी हा आणखी एक मोठा धक्का आहे. नेदरलँडच्या परराष्ट्रमंत्री वेल्डकॅम्प यांनी त्यांचा नियोजित इस्रायल दौरा रद्द केला आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) नेतन्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव गॅलंट यांच्यावर गाझामधील कथित युद्ध गुन्ह्यांशी संबंधित अरेस्ट वॉरंट जारी केल्यानंतर वेल्डकॅम्प यांनी हा निर्णय घेतला. वेल्डकॅम्प यांनी नेदरलँड्स ICC च्या निर्णयाचा आदर करत असल्याचे सांगितले आणि नेतन्याहू यांच्याशी सर्व अनावश्यक संपर्क तोडण्याची घोषणा केली. या घटनेमुळे नेतन्याहूंची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती अधिकच कमकुवत झाली आहे.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

इस्त्रायल-हमास युद्धात 44,000 हून अधिक लोकांचा बळी

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने आतापर्यंत 44,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या युद्धामुळे पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर मोठा हल्ला करत 1,200 इस्रायली नागरिकांना ठार केले आणि 250 हून अधिक लोकांना ओलीस धरले. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने गाझावर व्यापक हल्ले सुरू केले. त्यामुळे गाझातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

नेतन्याहूंच्या अटक वॉरंटमुळे इस्रायलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

या युद्धामुळे लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी, परिस्थिती अद्यापही नियंत्रणाबाहेर आहे. नेतन्याहूंच्या अटक वॉरंटमुळे इस्रायलच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या धोरणांवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. या संपूर्ण घटनाक्रमाचा इस्रायल-हमास युद्धावर तसेच जागतिक राजकारणावर काय परिणाम होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू मोठ्या अडचणीत; International Criminal Court ने जारी केले अरेस्ट वॉरंट

Web Title: Hamas killed 15 israeli soldiers in gaza nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 11:34 AM

Topics:  

  • Gaza
  • Hamas
  • Israel

संबंधित बातम्या

‘Operation Gideon’s Chariots’ इस्रायलची गाझा बळकावण्यासाठी नवी खेळी;  हजारो जीव धोक्यात
1

‘Operation Gideon’s Chariots’ इस्रायलची गाझा बळकावण्यासाठी नवी खेळी; हजारो जीव धोक्यात

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
2

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

गाझा ते सुदान… युद्धात महिलांचा शारीरिक छळ मोठ्या प्रमाणावर; संयुक्त राष्ट्रांनी सादर केला थरारक अहवाल
3

गाझा ते सुदान… युद्धात महिलांचा शारीरिक छळ मोठ्या प्रमाणावर; संयुक्त राष्ट्रांनी सादर केला थरारक अहवाल

इस्रायलची ‘गाझावर’ नियंत्रणाची तयारी सुरु; नेतन्याहूंनी पॅलेस्टिनींना दिला युद्धभूमी सोडण्याचा आदेश
4

इस्रायलची ‘गाझावर’ नियंत्रणाची तयारी सुरु; नेतन्याहूंनी पॅलेस्टिनींना दिला युद्धभूमी सोडण्याचा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.