
Hormuz Tension LPG Tanker Symi Reaches Kandla Port with 20,000 Tonnes Cargo
मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे मालवाहू जहाज सिमी तब्बल २०,००० टन एलपीजी घेऊन गुजरातच्या कांडला बंदरावर सुखरुप दाखल झाले आहेत. मार्शल्स आयलंडचा ध्वज असलेले हे जहाज १३ मे रोजी होर्मुझच्या खाडीतून भारताकडे रवाना झाले होते.
भारतासाठी हा पुरवठा अत्यंत दिलासादायक आहे. नुकतेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी नवी दिल्ली येथील ब्रिक्स परिषदेत भेट घेतली.या बैठकीत होर्मुझमध्ये भारतीय जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते की, व्यापारी जहाजांवर अशा प्रकारे हल्ले करणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. तसेच भारतीय उर्जे सुरक्षा आणि नाविकांवरील हल्ले जाणार नाही अशी सक्त ताकीद दिली होती.
दरम्यान या उच्चस्तरीय चर्चेत इराणने होर्मुझमधून भारतीय जहाजांना कोणताही धोका होणार नाही असा विश्वास दाखवला. भारतासारख्या परराष्ट्र मित्रांच्या व्यापारा जहाजांना पूर्णपणे सुरक्षा दिली जाईल असे म्हटले. यानंतर भारताचे सिमी मालवाहू जहाज सुरक्षितपणे होर्मुझमधून बाहेर पडले. हा भारताचा मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे.
याशिवाय भारताने जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदल आणि इतर सुरक्षा यंत्रणा अरब समुद्र आणि पर्शियन आखातात तैनात केल्या आहेत. आतपर्यंत भारताने १५ एलपीजी जहाजांना भारतीय नौदलाच्या मदतीने होर्मुझच्या धोकादायक क्षेत्रातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
#WATCH | Kachchh, Gujarat: The Marshall Islands-flagged tanker Symi, carrying approx 20,000 tonnes of LPG, arrives at the Kandla Port. Symi crossed the Strait of Hormuz on May 13. (Source: DPA Kandla) pic.twitter.com/nbdSwdmkio — ANI (@ANI) May 17, 2026
दरम्यान इराणने भारताच्या या शांततेच्या आणि परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. पश्चिम आशियतील तणावात भारताच्या मध्यस्थीची भूमिकेच देखील इराण स्वागत करेल, असे इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काजेम गरीबाबादी यांवुी म्हटले आहे.