Hormuz Conflict : 'खपवून घेणार नाही' होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ला; सरकारचा शत्रूला कडक इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे २०२६ एका भारतीय मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला झाला आहे. गुजरातच्या द्वारका येथील मालकीचे MSV हाजी अली हे जहाज सोमालियातील बेरबेरा बंदराहून शारजाहच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी जहाज ओमानच्या किनारपट्टीजवळ असताना अचानक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव होऊ लागला. १३ मेच्या पहाटे ३.३० च्या सुमारास होर्मुझ सामुद्रधुनीत हा भीषण हल्ला केला.
या हल्ल्यानंतर काही क्षणातच जहाजाला मोठी आग लागली आणि जहाजा समुद्रात बुडाले. या जहाजावर एकूण १४ क्रू मेंबर्स होते. सुदैवाने सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहे. संकटाची चाहूल लागताच या नाविकांनी प्रसंगावधान सांगत समुद्रात उडी मारली. त्यांनी तातडीने लाईफ जॅकेट्स घातले आणि लाईफ बोटीच्या मदतीने बाहेर पडले. यावेळी ओमानच्या कोस्ट गार्डने देखील तत्परता दाखवत १४ भारतीय नाविकांना सुखरुप बाहेर काढले.
दरम्यान या हल्ल्यावर भारताने संताप व्यक्त केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात कडक शब्दात संताप व्यक्त करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी म्हटले आहे की, व्यापारी जहाजांवर अशा प्रकारे हल्ले करणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. भारताने अशा प्रकारचे हल्ले आणि भारतीय नाविकांचे जीव धोक्यात आणण्याचे कृत्य सहन केले जाणार नाही अशी सक्त ताकीद दिली.
सध्या या घटनेवर भारतीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. दिवसेंदिवस होर्मुझमधून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला धोका निर्माण होत आहे. ज्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या अस्थिरतेमुळे जागतिक स्तराव तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण होत आहे. परिणामी इंधन दरात वाढ होत आहे. जगावर मोठे उर्जा संकट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Our statement on the attack on an Indian-flagged ship off the coast of Oman ⬇️ 🔗 https://t.co/whly2BJ4TJ pic.twitter.com/PF0wAQ14zY — Randhir Jaiswal (@MEAIndia) May 14, 2026






