IAEA's report says Iran developed the technology to make a nuclear bomb
तेहरान: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणने आपले अणु हत्यार बनवण्याचे तंत्रज्ञान तयार केले आहे. आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेना हा दावा केला आहे. संस्थेच्या अहवालानुसार, इराणने केवळ युरेनिम साठाचा वाढवला नाही, तर अमु बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली आहे. याच्या काही चाचण्या देखील घेण्यात आल्या आहेत. इराणच्या या कृतीमुळे जगभरात खळबळ अडाली आहे.
इराणने हे सर्व एवढ्या गुप्त पद्धतीने केल आहे की आता अमेरिका आणि इस्रायलच नव्हे तर संपूर्ण जग केवळ पाहत राहिले आहे. शिवाय हा खुलासा अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा अमेरिका आणि इराणमध्ये अणु कराराची चर्चा होत आहे. परंतु IAEA च्या या धक्कादायक खुलाशाने परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. तसेच इस्रायलने देकील इराणविरोधी लष्करी कारवाईचे संकेत दिले आहे. यामुळे तिसऱ्या युद्धाची भीती निर्माण झाली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये मोसाद गुप्तचर संस्थेने देखील असा अहवाला प्रसिद्ध केला होता.
IAEA च्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, इराणने २० वर्षापूर्वीच अणु बॉम्ब तंत्रज्ञानाचे प्रयोग सुरु केले होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, इराण कधीही त्यांची योजना सक्रिय करु शकतचो. २०२५ च्या अखेरपर्यंत इराणची अण्वस्त्रे बनवण्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे. इराणच्या लविझान-शिया आणि मरिवान या गुप्त क्षेत्रांवर स्फोटांचे न्यूट्रॉन डिटेक्टर आणि इम्प्लोजन सिस्टी ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी अणु हत्यारांच्या चाचण्या देखील सुरु आहेत.
IAEAच्या अहवालानुसार, इराणने २००३ मध्ये दोन इम्प्लोजन चाचण्या केल्या होत्या. यासाठी त्यांनी अणुबॉम्बच्या गाभ्याला स्फोट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, इराणने किमान ९ बॉम्ब बनवण्याइतके तंत्रज्ञान डिझाइन केले आहे. याशिवाय इराणने युरेनियमच्या साठ्याटे रुपांतर वायूमध्ये केले आहे. यासाठी इराणने UF6 सिलेंडर, रेडिएशन मापन उपकरण, हायड्रोफ्लोरिक ॲसिड आणि इतर रसायनांचा वापर केला आहे. ही सर्व उपकरणे बॉम्ब बनवण्याच्या प्रक्रियेत वापरली जातात.
यापूर्वी इराणने हे यासाहित्यांचे कंटेनर्स दूषित असल्याचे सांगितले होते. यामागे इराणचा त्यांचे धोकादायक काम लपवण्याचा प्रयत्न केला होता. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, इराणने २००९ ते २०१८ दरम्यान तुर्कुझाबादमध्ये त्यांच्या अणु शस्त्रे बनवण्यासाठी लागणार साहित्य लपवले होते. तसेच काही प्रयोगशाळेतून युरेनियमचे साठे देखील गायब झाले होते.
IAEAने अहवालात नमूद केले आहे की, त्यांना तपासादरम्यान इरामने वारंवापर चुकीची आणि परस्परविरोधी माहिती दिली आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास इराणने नकार दिला आहे. IAEA च्या या अहवालाला गंभीर मानले जात आहे. यामुळे हे प्रकरणे थेट संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिशदेकडे नेण्याची मागमी करण्यात येत आहे.