Donald Trump Opens to provide F-35 fighter jet to turkey on conditions
Donald Trump offers Turkey F-35 Fighter Jet’s : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ट्रम्प यांनी पुन्हा भारताच्या शत्रू देशाला आणि पाकिस्तानच्या मित्र देशाला मोठी ऑफर दिली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी तुर्कीला F-35 फायटर जेट विमाने देण्याची तयारी दर्शवली आहे.
ट्रम्प यांनी तुर्कीला (Turkey) संकेत दिले आहेत की, त्यांना पुन्हा एकदा अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमानांच्या कार्यक्रमात सामील केले जाऊ शकते. पण यासाठी तुर्कीला अमेरिकेची एक अट मान्य करावी लागणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्की समोर एक मोठी अट ठेवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, तुर्कीला रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) थांबवण्यासाठी अमेरिकेला मदत करावी. तरच त्यांना अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमानांच्या प्रकल्पात पुन्हा सामील केले जाईल. नुकतेच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी अमेरिकेला भेट दिली होती. यावेळी त्यांनी व्हाइट हाउसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.
हा एर्दोगान यांचा २०१९ नंतर पहिलाच अमेरिकेचा दौरा होता. यावेळी चर्चेदरम्यान एर्दोगान यांना ट्रम्प यांनी तुर्कीला रशियाकडून तेल खरेदी करण्यास सांगितले. तसेच आपल्या प्रभावाचा वापर करुन रशियावर युद्धबंदीसाठी दबाव आणावा असेही ट्रम्प यांनी म्हटले. तुर्की रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यात यशस्वी झाला तर तुर्कीवरील S-400वरील घालण्यात आलेले निर्बंध हटवले जाणार आहेत.
२०१९ मध्ये अमेरिकेने f-35 करारातून तुर्कीला बाहेर काढले होते. कारण तुर्कीने रशियाकडून S-400 ही संरक्षण प्रणाली खरेदी केली होती. अमेरिकेच्या मते, तुर्कीने F-35 आणि S-400 चा एकाच वेळी वापर केल्यास त्यांचे तंत्रज्ञा रशियापर्यंत पोहचू शकते. यामुळे तुर्कीला या करारातून बाहेर काढून त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले होते. पण ट्रम्प आता हे निर्बंध हटवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, पण यासाठी तुर्कीला रशियाकडून तेल खरेदी बंद करावी लागणार आहे. मात्र अद्याप तुर्कीकडून यावर कोणतेही अधिकृत विधाने आलेले नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीला कोणतीही ऑफर दिली?
डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीला पुन्हा F-35 कार्यक्रमात सामील करण्याची ऑफर दिली आहे, पण यासाठी ट्रम्प यांनी एक मोठी अट ठेवली आहे.
ट्रम्प यांनी तुर्की समोर कोणती अट ठेवली आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीसमोर रशियाकडून तेल खरेदी थांबण्याचे आवाहन केले आहे, तसेच त्यांच्या प्रभावाचा वापर करुन रशियावर युद्धबंदीसाठी दबाव आणावा असे म्हटले आहे.