
फोटो सौजन्य AI
इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कुटुंबीय आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफकडून यापूर्वीही चिंता व्यक्त करण्यात आली होती. विशेषतः त्यांच्या दृष्टीशी संबंधित समस्यांमुळे त्यांच्या वैद्यकीय उपचारांचा मुद्दा चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या वैद्यकीय तपासणीसंदर्भात निर्देश दिल्यानंतर हा विषय आणखी गंभीर बनला.
याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेट कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला इम्रान खान यांच्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे. तुरुंगातील कैदी असला तरी त्याला आवश्यक वैद्यकीय उपचार आणि मूलभूत मानवतावादी सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे या आवाहनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
POK News : JAAC चा नवा एल्गार; विधानसभेतील १२ राखीव जागा रद्द करण्याची मागणी
सुनील गावसकर आणि कपिल देव यांच्यासोबत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि इतर देशांतील माजी कर्णधारांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेल्या या दिग्गजांनी इम्रान खान यांच्यासाठी एकत्र येणे विशेष चर्चेचा विषय ठरले आहे.
इम्रान खान यांनी 1992 मध्ये पाकिस्तानला पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला होता. त्यामुळे क्रिकेट विश्वात त्यांची वेगळी ओळख आहे. गावसकर, कपिल देव आणि इतर माजी कर्णधारांनी ही भूमिका राजकीय नसून मानवतावादी असल्याचे स्पष्ट केले आहे. इम्रान खान यांच्या राजकीय विचारांना किंवा त्यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याऐवजी, माजी क्रिकेटपटू म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, यावर त्यांनी भर दिला आहे.
Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी
या पत्रातून इम्रान खान यांच्या वैद्यकीय तपासणी आणि उपचारांबाबत तीन महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार स्वतंत्र वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, त्यासाठी इम्रान खान यांच्या वैयक्तिक डॉक्टरांचाही समावेश असावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांना नियमित भेटण्याची परवानगी कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळावी आणि वैद्यकीय तपासणीत उपचारांची आवश्यकता आढळल्यास ते तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
गावसकर आणि कपिल देव यांच्यासारख्या भारतीय क्रिकेट दिग्गजांनी इम्रान खान यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेमुळे या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेटमधील ऐतिहासिक प्रतिस्पर्धा असतानाही मानवतावादी मुद्द्यावर दोन्ही देशांच्या माजी कर्णधारांनी एकत्र येणे हा या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचा पैलू ठरला आहे.