भारतीय हवाई दल फ्रान्सकडून 114 राफेल विमाने खरेदी करणार असल्याचे वृत्त समोर आलं आहे. सरकारनेही या कराराला हिरवा कंदील दिला आहे. त्यासोबतच 5 व्या जनरेशन स्टील्थ जेट खरेदीची प्रक्रियाही वेग धरत आहे. वृतांनुसार भारताचा यासाठी रशियाच्या Su-57 कडे अधिक कल आहे. या वृत्तामुळे सध्या अमेरिकेत अस्वस्थता वाढली आहे. अमेरिकन तज्ज्ञांनीही सांगितलं की, वॉशिंग्टनने भारताच्या चिंतेकडे लक्ष दिले पाहिजे, नाहीतर मोठं सामरिक नुकसान होऊ शकतं.
भारतासाठी पाचव्या पिढीची विमानं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण चीनकडे अशी विमाने आधीपासूनच अस्तित्वात आहेत आणि आता चीन पाकिस्तानला पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने विकण्याच्या नियोजनावर काम करत आहे. या सर्व गोष्टींबाबत अमेरिकन विश्लेषकांनी इशारा दिला आहे.
अमेरिकन विश्लेषकांच्या मते.दक्षिण आशियातील बदलत्या सामरिक समीकरणांमध्ये भारताला रशियाच्या अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमानांपासून दूर ठेवण्यासाठी अमेरिका मोठा संरक्षण प्रस्ताव देऊ शकते.
वॉशिंग्टनमधील इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक एअर स्टडीजचे वरिष्ठ सहकारी आणि रणनीतिक तज्ज्ञ डॉ. मार्कस हेल यांच्या मते, अमेरिका भारताला रशियाच्या Su-57E ऐवजी लॉकहीड मार्टिनच्या F-35A स्टेल्थ फायटरचा पर्याय देऊन एक नवीन धोरणात्मक दिशा ठरवण्याचा प्रस्ताव आहे.
‘इंडियन डिफेन्स रिसर्च विंग’च्या अहवालानुसार, हा संपूर्ण घटनाक्रम दक्षिण आशियातील बदलत्या हवाई शक्तीच्या संतुलनाशी निगडीत आहे. विश्लेषकांचे म्हणणं आहे की, चीनची J-35A स्टेल्थ विमाने घेण्याची पाकिस्तानची योजना आणि चीनच्या J-20 फायटर फ्लीटचा विस्तार यामुळे प्रादेशिक शक्ती संतुलनावर परिणाम होऊ शकतो. चीनचा जर हा डाव असेल तर त्याचा भारतावर परिणाम होऊ शकतो. कारण या दिशेने वेगाने प्रगती झाल्यास भारतावरही पाचव्या पिढीतील लढाऊ क्षमता विकसित करण्याचा दबाव वाढणार आहे.
डिजिटल शीतयुद्धाची चाहूल : एआय पायाभूत सुविधांवरून अमेरिका-चीन आमनेसामने, भारतासमोर रणनीतीचे आव्हान






