‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी
पेंटागनचे प्रवक्ते सीन पार्नेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर यासंदर्भात माहिती दिली. हसनच्या मृत्युदंडाची अंमलबजावणी नेमकी कधी आणि कुठे केली जाईल, याबाबत संबंधित लष्करी अधिकारी निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या मंजुरीनंतर शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पुढे जाणार आहेत.
World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
निदाल मलिक हसन हा अमेरिकी सैन्यातील माजी मेजर आणि मानसोपचारतज्ज्ञ आहे, जो टेक्सासमधील फोर्ट हूड लष्करी तळावर ५ नोव्हेंबर २००९ रोजी झालेल्या सामूहिक गोळीबाराचा सूत्रधार म्हणून ओळखला जातो. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आणि ३० हून अधिक जण जखमी झाले.
2009 मध्ये अमेरिकेच्या टेक्सासमधील फोर्ट हूड लष्करी तळावर हसनने गोळीबार केला होता. हसन हा अमेरिकन लष्करात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. सैनिकांची वैद्यकीय तपासणी सुरू असलेल्या इमारतीत त्याने गोळीबार केल्याने 13 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्यामागील आपली भूमिका स्पष्ट करताना हसनने अफगाणिस्तानात जाणाऱ्या अमेरिकी सैनिकांना रोखण्याच्या उद्देशाने आपण हे कृत्य केल्याचे म्हटले होते. खटल्यादरम्यान त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी फारसा प्रयत्न केला नसल्याचेही माहिती समोर आली.
राष्ट्राध्यक्षांची मंजुरी मिळाली असली तरी हसनला तातडीने मृत्युदंड दिला जाईलच असे नाही. त्याच्याकडे संघीय नागरी न्यायालयात ‘हॅबियस कॉर्पस’ याचिकेसह अन्य कायदेशीर पर्याय उपलब्ध असू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षेची अंमलबजावणी अनेक वर्षे लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या लष्करी न्यायव्यवस्थेत मृत्युदंड अत्यंत दुर्मीळ आहे. यापूर्वी 1961 मध्ये प्रायव्हेट जॉन बेनेट याला मृत्युदंड देण्यात आला होता. त्यामुळे हसनच्या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि प्रत्यक्ष शिक्षेच्या अंमलबजावणीकडे आता लक्ष लागले आहे.
Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार






