Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फवाद, माहिरा ते शाहिद आफ्रिदी… भारताने 24 तासांत पुन्हा पाकिस्तानच्या सोशल मीडिया हँडल्सवर घातली बंदी

Pakistani celebs social ban India : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने पुन्हा एकदा पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 03, 2025 | 11:06 AM
India bans Pakistani celebs social media again in 24 hrs

India bans Pakistani celebs social media again in 24 hrs

Follow Us
Close
Follow Us:

Pakistani celebs social ban India : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने पुन्हा एकदा पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शाहिद आफ्रिदी, फवाद खान, माहिरा खान, हानिया आमिर, अली जफर, सबा कमर आणि इतर अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकारांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी, या सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया हँडल्सवरील बंदी काही काळासाठी उठवण्यात आली होती. मात्र, बुधवारी दिसलेली ही मोकळीक केवळ २४ तासांतच संपुष्टात आली आणि गुरुवारी या सर्व हँडल्सवर पुन्हा बंदी लागू करण्यात आली.

पहलगाम हल्ल्यानंतर उधाणलेले तणावाचे वादळ

अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले. या घटनेनंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतले आणि यामध्ये १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईनंतर दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढला.

याच पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानच्या सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील उपस्थितीवर आक्षेप घेत, त्यांच्या हँडल्सवर बंदी घातली. या निर्णयाचा उद्देश दहशतवाद्यांबाबत सौम्य भूमिका घेणाऱ्या किंवा भारताविरुद्ध अप्रत्यक्षपणे भूमिका घेणाऱ्या व्यक्तींना भारतीय सोशल स्पेसमधून दूर ठेवण्याचा आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कहाणी आहे ‘या’ हजार वर्ष जुन्या शिव मंदिराची, जे बनले आहे थायलंड-कंबोडियामधील संघर्षाचा केंद्रबिंदू

हानिया आमिर आणि ‘सरदार जी 3’ प्रकरण

विशेष म्हणजे, पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर हिने अलीकडेच भारतीय अभिनेता दिलजीत दोसांझ याच्यासोबत ‘सरदार जी ३’ या चित्रपटात काम केले होते. या सहयोगामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर हानियाच्या हँडलवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे.

‘हे अकाउंट भारतात उपलब्ध नाही’  बंदीची पुष्टी

शाहिद आफ्रिदी, फवाद खान, माहिरा खान आणि इतर सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया प्रोफाइल्स शोधल्यास, त्यावर “This account is not available in your country” असा संदेश दिसत आहे. हेच दर्शवते की, भारतातून या अकाउंट्सवर प्रवेश पुन्हा बंद करण्यात आला आहे. सुरुवातीला ही बंदी केवळ ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान लावण्यात आली होती, परंतु बुधवारी अचानक काही अकाउंट्स भारतात पुन्हा उपलब्ध झाली होती. यामुळे नेटिझन्समध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गुरुवारी या सर्व हँडल्स पुन्हा बंद करण्यात आल्याने भारत सरकारचा कडक संदेश स्पष्ट झाला आहे.

सरकारी प्रतिक्रिया अद्याप प्रतीक्षेत

या निर्णयावर भारत सरकारने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, सुरक्षा यंत्रणा आणि सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये सतत समन्वय सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन करत आहे तिसऱ्या महायुद्धाची तयारी? बीजिंगजवळ अणुहल्ला झेलू शकणारे गुप्त लष्करी शहर उभारले

कलाविश्वावरही राजकारणाचा प्रभाव

भारत-पाकिस्तानमधील राजनैतिक तणावाचा परिणाम केवळ सीमारेषेपर्यंत मर्यादित राहत नाही, तर तो संस्कृती, कला आणि सोशल मीडियावरही प्रभाव टाकतो. पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चित्रपटसृष्टीत काम केले असले तरी, सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर भारत कठोर पावले उचलत आहे. या बंदीमुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणेवरही मर्यादा येण्याची शक्यता आहे, आणि याचा परिणाम प्रेक्षकांच्या भावना आणि दोन्ही देशांतील कलात्मक संबंधांवर होऊ शकतो.

Web Title: India bans pakistani celebs social media again in 24 hrs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • india
  • India pakistan Dispute
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त
1

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया
2

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
3

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर
4

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.