प्रेह विहार मंदिर: एक हजार वर्ष जुना वारसा, जो थायलंड-कंबोडियामधील संघर्षाचे कारण ठरला! ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Preah Vihar temple dispute : एकेकाळी केवळ भक्तांच्या प्रार्थनांनी भरून राहणारे मंदिराचे प्रांगण आज बंदुकीच्या आवाजांनी हादरत आहे. ही आहे कथा ‘प्रेह विहार’ मंदिराची, जे सुमारे एक हजार वर्षे जुने हिंदू मंदिर असून, आज थायलंड आणि कंबोडिया या दोन शेजारी देशांमधील वादाचे केंद्रबिंदू बनले आहे.
हा संघर्ष इतका गहिरा आहे की त्याने थायलंडचे पंतप्रधान पतोंगथॉर्न शिनावात्रा यांच्यावरही परिणाम केला. २ जुलै २०२५ रोजी थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने त्यांना निलंबित केले. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी एका वरिष्ठ कंबोडियन नेत्याशी गुप्त आणि जवळचे संबंध ठेवले. एका लीक झालेल्या फोन कॉलमध्ये त्यांनी त्याला ‘काका’ संबोधले होते, आणि हाच संवाद थायलंडमध्ये राजकीय वादळाचे कारण बनला.
प्रेह विहार मंदिर हे ९व्या शतकात ख्मेर सम्राट सूर्यवर्मन I यांनी भगवान शिवासाठी बांधलेले प्राचीन मंदिर आहे. सध्या हे मंदिर कंबोडियाच्या सीमावर्ती प्रांतात स्थित असले तरी, थायलंडचा दावा आहे की मंदिराचा काही भाग त्यांच्या भूभागात येतो. २००८ मध्ये युनेस्कोने या मंदिराचा जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश केल्यानंतर वाद अधिक भडकला. त्यानंतरच्या काही वर्षांत विशेषतः २००८ ते २०११ दरम्यान – सीमांवर अनेक वेळा गोळीबार, संघर्ष, आणि मृत्यू झाले. हजारो नागरिकांना आपले घरदार सोडावे लागले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गनपावडरच्या सावलीत ‘Hormuz’! भारत-चीन तेल मार्ग नष्ट करण्याचा इराणचा हेतू, समोर आले भयानक सत्य
२८ मे २०२५ रोजी, या सीमावादाने पुन्हा हिंसक स्वरूप घेतले. कंबोडियाच्या दाव्यानुसार, त्यांच्या सैन्याने मंदिराच्या परिसरात नियमित गस्त घालत असताना थाई सैनिकांनी अचानक हल्ला केला. दुसरीकडे थायलंडचे म्हणणे आहे की गोळीबाराची सुरुवात कंबोडियाकडून झाली. या संघर्षात एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला, ज्यामुळे वातावरण अधिक चिघळले. १ जून रोजी, कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी हा विषय थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) नेण्याचा निर्णय घेतला. त्यांना संसदेतही पाठिंबा मिळाला. जरी थायलंड ICJ चे अधिकारक्षेत्र मान्य करत नसेल, तरी १४ जून रोजी दोन्ही देशांनी संयुक्त सीमा समितीद्वारे वाटाघाटी करण्याचे मान्य केले.
Thailand and Cambodia are disputing the Preah Vihear Temple again. The yellow star marks our homestead’s location.
Can’t the warmongers relax?
I’m not concerned; this happens periodically.
Our PM was just ousted too, but at least it wasn’t another militery coup. pic.twitter.com/Tg5inMwi4u
— GreenEvolutions (@Green3volutions) July 1, 2025
credit : social media
२०११ मध्ये जेव्हा संघर्ष शिगेला पोहोचला होता, तेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) हे प्रकरण ASEAN संघटनेकडे सोपवले होते. इंडोनेशियाच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी सीमा निरीक्षक पथकांस मान्यता दिली होती. मात्र, यावेळी संघर्ष उफाळूनही ASEAN कडून कोणताही ठोस प्रतिसाद समोर आलेला नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : उत्तराधिकारी कोण? दलाई लामा यांनी केला खुलासा आणि चीनला दिले जशास तसे उत्तर
प्रेह विहार मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नसून, दोन देशांमधील राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक बनले आहे. हे मंदिर कितीही पवित्र असले, तरी त्याभोवतीचे राजकीय आणि भौगोलिक वाद दिवसेंदिवस उग्र होत चालले आहेत. इतिहासाचा हा मौल्यवान वारसा रक्ताने माखला जाऊ नये, यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थी आणि शांततामूलक संवाद गरजेचा आहे. अन्यथा, एक हजार वर्षे जुने मंदिर हे यापुढेही संघर्षाचे कारण ठरत राहील.