भारत-कॅनडा संबंधामध्ये नव्या पर्वाची सुरुवात? पंतप्रधान मार्क कार्नी लवकरच भारत दौऱ्यावर येणार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कॅनडाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान कार्नी २०२६ मध्ये भारताला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरुन ते भारतात येते आहे. २०२६ च्या सुरुवातीला त्यांचा हा दौरा होणार आहे. सध्या याची तयारी असून तारीख निश्चित करण्याचे काम सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये जी-२० परिषदेवेळी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि ऊर्जा अशा विविधा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली होती.
तसेच संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातही संबंध पुढे नेण्यावर विचारांची देवाण-घेवाण झाली. निवदेनानुसार, भारत आणि कॅनडामध्ये वस्तू, सेवा, गुंतवणूक, शेती, डिजिटल व्यापार आणि शाश्वत विकासावर संपर्क वाढवला जाणार आहे. यासाठी महत्त्वकांक्षी व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) करण्याची सहमती दोन्ही नेत्यांनी दर्शवली आहे.या सर्व घडामोडींवर आणि दोन्ही नेत्यांच्या वार्तालापवरुन लक्षात येते की भारत आणि कॅनडा संबंधामध्ये पुन्हा एकदा सुधार होत आहे.
या रॅलीमध्ये कॅनडाच्या ओंटारियो, अल्बर्टा आणि ब्रिटिश कोलंबिया आणि क्यूबेकमधील ५३ हजाराहून अधिक खलिस्तानी समर्थकांनी भाग घेतला होता. यावेळी लोकांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. तसेच भारतीय ध्वज फाडला. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर यांची १८ जून २०२३ रोजी हत्या करण्यात आली होती. कॅनडाती एका गुरुद्वाराबाहेर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दरम्यान निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारताच्या सहभागाचा आरोप केला होता. ज्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले. परंतु कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाने संबंधामध्ये पुन्हा सुधारणा होताना दिसत आहे.
शिवाय याच वेळी जी-२० दरम्यान भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात ACITI भागीदारीची घोषणा करण्यात आली आहे. या तिन्ही देशांनी तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनेच्या विकासासाठी ही घोषणा केली आहे.
जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा
Ans: कॅनडाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान कार्नी २०२६ मध्ये वर्षाच्या सुरुवातील भारताला भेट देणार आहेत.
Ans: कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर हत्याकांडात भारताच्या सहभागाचा आरोप केला होता, ज्यामुळे भारत आणि कॅनडातील संबंध बिघडले होते.
Ans: जोहान्सबर्ग येथे जी-२० दरम्यान पंतप्रधान मोदी आणि मार्क कार्नी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि ऊर्जा अशा विविधा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली होती. तसेच संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातही संबंध पुढे नेण्यावर विचारांची देवाण-घेवाण झाली






