Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India China Tension : चीनने पुन्हा डिवचंल! अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची बदलली नावे; भारताने ‘असं’ सुनावलं की ड्रॅगनची बोलतीच बंद

India China Tension : भारत आणि चीनमध्ये पुन्हा वादाची ठिणगी उडाली आहे. चीनने अरुणाचल प्रदेशात केलेल्या चिथावणीखोर कृत्यामुळे वाद पेटला आहे. चीनच्या कृतीवर भारतानेही सडेतोड उत्तर दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 13, 2026 | 11:39 AM
India China Tension

India China Tension

Follow Us
Follow Us:
  • अरुणाचल प्रदेशात चीनचं मोठं षड्यंत्र
  • अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची बदलली नावे
  • भारताने दिलं सडेतोड उत्तर
India China Border Dispute : नवी दिल्ली/बीजिंग : भारत आणि चीनमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. सीमावादावरुन आधीच तणाव असताना चीनने भारताला पुन्हा डिवचलं आहे. चीनने भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलली आहेत. परंतु भारताने याचा तीव्र विरोध केला आहे. अरुणाचल (Arunachal) हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहिल असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

India China Trade : भारत-चीन व्यापारात नवे वळण! ड्रॅगनने बदलले सूर, द्विपक्षीय व्यापार सुधारण्याची इच्छा

काय आहे नेमकं प्रकरण?

चीनने नुकतेच अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलून यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये चीनने अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिब्बत म्हटले असून चीनच्या नकाशात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञांच्या मते, चीन (China) असे करुन एक सायकॉलॉजिकल वॉरफेअरची घोषणा करत आहे. याद्वारे जागतिक स्तरावर आपला खोटा दावा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.

भारताचे सडेतोड उत्तर

चीनच्या या कृतीवर बारताने तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आक्रमक भूमिका घेत ड्रॅगनला सुनावले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी म्हटले की, चीनने कितीही काल्पनिक नावे ठेवली, नवे नकाशे बनवले तरी अरुणचाल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि राहिल. अशा आधारहीन आणि आक्रमक कृतीने काहीही साध्य करता येणार नाही असे जयस्वाल यांनी ठणकावून सांगितले आहे.

काय आहे चीनच्या या कृत्यामागचं कारण?

नुकतेच ०९ एप्रिल २०२६ रोजी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टिनंट जनरल केटी परनाईक यांनी तवांगमधील नियंत्रणे रेषेवरील चौक्यांना भेट दिली होती. भारतीय लष्कर आणि ITBP च्या जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा दौरा होता. या दौऱ्यामुळे चीन बिथरला असून भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे.

चीनने अशा प्रकारे नावे बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१७ आणि २०२१ मध्येही चीनने असे चिथावणीखोर कृत्य केले होते. त्यावेळी देखील भारताने चीनला सडेतोड उत्तर दिले होते. परंतु चीन काही सुधारण्याचे नाव घेईना. चीनचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन मानले मानले जात आहे.

भारताने वारंवार स्पष्ट केले आहे की, भारत आपल्या प्रादेशिक अखंडत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही. चीनने पुन्हा असे कृत्य केल्यास त्याला चोख उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत असे भारताने स्पष्ट केले आहे.

भारताला धक्का! इराणहून येणारा ६ लाख बॅरल तेलाचा टँकर अचानक चीनकडे वळाला; काय आहे प्रकरण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीनने भारतविरोधी कोणता डाव खेळला आहे?

    Ans: चीनने भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलली आहे.

  • Que: चीनच्या या कृतीवर भारताने काय भूमिका घेतली?

    Ans: भारत सरकारने चीनला सडेतोड उत्तर दिले आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि राहिल असे स्पष्ट शब्दात भारताने सांगितले आहे. तसेच चीनने कितीही नावे बदलली, नकाशे तयार केली तरी यातून त्यांना काहीही साध्य होणार नाही हे भारताने म्हटले आहे.

Web Title: India china tension beijing renames places in arunachal pradesh mea hits back

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Arunachal pradesh
  • China
  • India china Border Clash
  • MEA
  • World news

संबंधित बातम्या

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार
1

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
2

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
3

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!
4

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.