US-EU Tension : अमेरिकेशिवाय तुमची लायकी काय? भारत-ईयू Mother of Deals मुळे ट्रम्पचा जळफळाट ; युरोपला गंभीर इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारत-ईयू डीलमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये संताप उफळला आहे. अमेरिका (America) आणि युरोपमधील तणाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नाटोचे प्रमुख मार्क रुट यांनी केलेल्या विधानामुळे हा वाद अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाटोचे महासचिव मार्क रुट यांनी युरोपची सुरक्षा ही अमेरिकेवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, अमेरिकेशिवाय युरोप आपली सुरक्षा करु शकणार नाही, तो केवळ याचे स्वप्न पाहू शकतो. आपल्या संसदीय भाषणात मार्क रुट यांनी म्हटले की, युरोपची संरक्षण व्यवस्था मर्यादित असून अमेरिकेच्या न्यूक्लियर अंब्रेलावर आधारित आहे. त्यांच्या मते, अमेरिकने युरोपची सुरक्षा काढून घेतली तर युरोपला संरक्षण खर्चात वाढ करावी लागले. ही वाढ युरोपला आर्थिकदृष्ट्या शक्य नाही असे मार्क रुट यांचे म्हणणे आहे.
याच वेळी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी देखील युरोपवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे २५% टॅरिफ लादले, पण आमच्या युरोपीय मित्रांनी याला पाठिंबा दिला नाही, तर याउलट तो भारतासोबत मोठा व्यापार करार करत आहेत.
स्कॉट बेसेंट यांच्या मते, युरोप स्वत:च त्यांच्याविरुद्धच्या युद्धाला निधी पुरवत आहे. सध्या या दोन्ही विधानांमुळे तीव्र खळबळ उडाली आहे. या विधानांवरुन स्पष्ट होत आहे की भारत आणि युरोपमधील व्यापार करार अमेरिकेला खटकत आहे. यामुळे अमेरिका आणि युरोपमधील तणाव वाढत आहे. यामुळे अमेरिकेने थेट युरोपच्या सुरक्षेवर आघात केला आहे.
Ans: नाटो प्रमुख मार्क रुटे यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे, त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेशिवाय युरोप स्वत:ची सुरक्षा करुन शकत नाही. यामुळे त्यांच्या संरक्षण खर्चात मोठी वाढ होईल. कारण अमेरिका युरोपला लष्करी आणि अण्वस्त्र शस्त्रे देतो.
Ans: अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी युरोप स्वत:विरुद्धच रशिया युद्धाला निधी पुरवत असल्याचे म्हटले आहे.






