India Pakistan ceasefire Pakistan Foreign Minister Ishaq Dar Threaten to India amid ceasefire
इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करुन देखील पाकिस्तान सुधारलेले नाही. पाकिस्तानचे वर्णन अनेक तज्ज्ञांनी कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडी या भाषेत केलेले आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा भारताला गिधड धमकी दिली आहे. भारतासोबत युद्धबंदी करारा लागू होऊनही पाकिस्ताचे मंत्री चवळाथलेल्या असस्थेत असून भारताला धमकी देत आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी असे विधान केले आहे की, यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
इशाक दार यांनी सिंधू पाणी करारावर जर तोडगा निघाला नाही, तर युद्धबंदीला काहीही अर्थ नाही असे म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारताच्या पश्चिम राज्यांतील अनेक भागांवर हल्ला केला. परंतु भारताने पाकिस्तानचे प्रत्येक हल्ले हाणून पाडले आणि हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यादरम्यान पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान युद्धबंदी लागू झाल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी सीएनएनला मुलाखत दिली.
या मुलाखतीदरम्यान इशाक दार यांनी सिंधू पाणी करारवर खळबळजनक विधान केले. त्यांनी म्हटले की, जर सिंधू पाणी कराराचा प्रश्न सोडवण्यात आला नाही, तर युद्धबंदीला काहीही अर्थ उरत नाही. हा प्रश्न सोडवला गेला नाही, तर हे युद्ध मानले जाईल असेही इशाक दार यांनी म्हटले. यापूर्वीही सिंधू पाणी करारावरुन पाकिस्तानच्या मंत्र्यांनी अनेक वेळा धमक्या दिल्या आहेत. तसेच अणु हल्ल्याच्याही धमक्या पकिस्तानने दिल्या आहेत.
पाकिस्तानच संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी भारताला धमकी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, भारताने सिंधूचे पाणी अडवल्यास आम्ही हल्ला करुन. तसेच पाकिस्तानचे बिलवाल भुट्टो यांनीही म्हटलो होते की, सिंधू नदी पाकिस्तानची आहे, त्यात एकतर पाणी वाहेल किंवा त्यांचे रक्त. तसेच पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून अणु हल्ल्याच्याही धमक्या येत होत्या. दरम्यान पुन्हा एकदा पाकिस्तान परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी खळबळजनक विधान केले आहे.
दरम्यान भारताने युद्धबंदी लागू केल्यानंतरही सिंधू जल करार स्थिगतच ठेवला आहे. यावर कोणतीही चर्चा होणार नाही असे भारताने म्हटले आहे. तसेच पाकिस्तानसोबत केवळ दहशतवादावर चर्चा होईल, आणि काश्मीर हा भारताचाच राहिल त्यावरही कोणती चर्चा होणार नाही असे भारताने स्पष्ट केले आहे.
दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशार दिला आहे की, इथून पुढे त्यांच्या कोणत्याही दहशतवादी कारवायांना सहन तेले जाणार नाही. यामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही धमकी त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीबाबत अनिश्चितता कायम आहे.