भारत पाक युद्धात चीनचा प्रत्यक्ष सहभाग? शस्त्र पुरवल्याचा दावा खोटा असल्याचे केले स्पष्ट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बिंजिंग: भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. चीनने म्हटले होते की, पाकिस्तानचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्या राखण्यासाठी त्यांचा पाकिस्तानला पाठिंबा आहे. असे चीनने परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले होते. दरम्यान १० मे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा झाली. या घोषणेनंतर चीनकडून पाकिस्तानला लष्करी पाठिंब्याच्या चर्चा सुरु झाल्या.
सोशल मीडियावर दावा केला जात होता की, चीनच्या सर्वात मोठ्या मालवाहू कार्गो विमानाने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली जात होती. दरम्यान या दाव्यांवर चीनची प्रतिक्रिया समोर आली आहे. चीनने या सर्व गोष्टी निराधार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. तसेच अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही चीनने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील संवदेनशील परिस्थितीत दिशाभूल करणारी माहिती पसरवणे हे षड्यंत्र असल्याचे चीनने म्हटले. चीनने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानला चीनच्या मालवाहून विमानाने कोणत्याही प्रकारचा शस्त्र पुरवठा करण्यात आलेला नाही.
चीनच्या लष्कराने यासंबधी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, चीनने Y-20 विमानांनी कोणताही लष्करी पुरवठा पाकिस्तानला पाठवलेला नाही. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेले सर्व माहिती आणि फोटो खोटे असल्याचे म्हटले आहे. चीनने पाकिस्तानला कोणताही लष्करी पाठिंबा दिलेला नाही, असे स्पष्ट करम्यात आले आहे. अलीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली आहे.
दरम्यान भारताच्या पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मोहीमेंतर्गत बारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करुन टाकले होते. भारताच्या या कारवाईनतर चीनने आपली प्रतिक्रिया देत, ऑपरेशन सिंदूर ला खेदजनक म्हणून वर्णन केले होते.
चीनने म्हटले होते की, “भारताची ही कारवाई खेदजनक आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही शेजारी देश आहेत, तसेच आमचेही शेजारी आहे. चीन दहशतवादाला पूर्णपण विरोध करतो. दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि संवादाच्या मार्गाने वाद सोडवावा.
चीनने दहशतवादाला विरोध केला असला तरी पहिल्यापासूनचा पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे चीनने पाकिस्तानला लष्करी पाठिंबा दिला असल्याचेही म्हटले जात होते. परंतु चीनने पाकिस्तानला कोणताही लष्करी शस्त्रास्त्रांचा पुरवठा केलेला नाही, या सर्व अफवा आहेत, हे स्पष्ट केले आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांवरोदात कारवाईचा इशारा देखील दिला आहे.