इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली. भारताने सिंधू जल करारा रद्द केला आहे. तसेच वुलर सरोवराचे आणि चिनाब नदीचे पाणी देखील अडवले आहे. पाकिस्तानातून होणाऱ्या व्यापारवरही भारताने पूर्णत: बंदी घातली आहे. याशिवाय पाकिस्तान भारताच्या संभ्याव्य लष्करी कारवाईच्या भीतीने चांगलाच बिथरला आहे. यामुळे जगातील इतक देशांकडून मदतीची भीक मागत आहे. याच वेळी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक क्लोज डोअर मिटिंग बोलावली होती. परंतु या परिषदेत पाकिस्तानलाच फटका बसला आहे.
संयुक्त राष्ट्र परिषदेत बंद दरवाज्या आड झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानने या बैठकीचे उद्दिष्ट साध्य झाले असे म्हटले होते. परंतु पाकिस्तानचा हा खोटेपणा बाहेर पडला आहे. या बंद दरवाज्या आड झालेल्या बैठकीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर पाकिस्तानने मौन पाळले. या बैठकीत पाकिस्तानला तीन प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये पहलगाम हल्ल्यामागे असलेली दहशतवादी संघटना टीआरएफच्या भूमिकेवर पाकिस्तानला फटकारण्यात आले. तसेच भारताविरुद्ध पसरवलेल्या खोट्या कथित गोष्टीही मान्य करण्यास संयुक्त राष्ट्रांनी नकार दिला. याशिवाय, अणु हल्ल्याच्या धमकीबद्दलही पाकिस्तानला सुनावण्यात आले. तसेच भारताच्या संभाव्य लष्करी कारवाईवरही पाकिस्तानने बोलण्यास नकार दिला. याशिवाय, पाकिस्तानाला संयुक्त राष्ट्रानी UNSC चे सदस्यत्व देणेही नाकारले आहे. सध्या पाकिस्तान सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य आहे.
UNSC च्या बंद दरवाज्या मागे झालेल्या या बैठकीत अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटेनने प्रश्नांचा हल्ला केला. या प्रश्नांची थेट उत्तरे पाकिस्तानला देता आली नाही. यामध्ये पाकिस्तानला तीन प्रश्न विचारण्यात आले.
धक्कादायत बाब म्हणजे यावेळी मित्र देश चीननेही पाकिस्तानची कोणतीही बाजू या परिषेदत घेतली नाही. यामुळे पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्रांमध्ये अपमान होऊनही पाकिस्तान चर्चा यशस्वी झाल्याची डिंगे हाकत होता. परंतु पाकिस्तानचे गुपित उघडले पडले आहे.






