'आम्ही भारताचा नकाशा बदलू...' ; पाकिस्तानची पुन्हा युद्धाची धमकी; दहशतवाद्यांसह असीम मुनीरचा नवा डर्टी प्लॅन उघड (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
‘भारत हिंमत करणार नाही…’ ; Operation Sindoor 2.0 वर दहशतवादी हाफिज सईदची पोकळ धमकी, VIDEO
अहवालानुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) ने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जमात-उद-दावा (JuD) यांसारख्या संघटनांशी हातमिळवणी केली आहे. या संघटनांसोबत मिळून असीम मुनीरने भारविरोधी कुरघोड्या सुरु केल्या आहे. या संघटना गेल्या काही काळापासून असीम मुनीर यांच्यासोबत गुप्त बैठका घेत आहे. तसेच महिला आणि मुलांना दहशतवादाचे प्रशिक्ष दिले जात आहे. या दहशतवादी संघटानांनी भारतविरोधी विष ओकायला सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दहशतवादी अताउल्लाह घिलजईने भारतला थेट धमकी दिली होती. त्याने भारताचा नकाशा बदलून टाकू, अतंर्गत सीमांपर्यंत पोहोचू अशी चिथावणीखोर धमकी दिली होती. शिवाय दहशतवादी हाफिज सईदने देखील अनेक गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व दहशतवाद्यांची सभांना लष्कराकडून खतपाणी दिले जात आहे. स्वत:हा लष्करप्रमुख मुनीर देखील भारतविरोधी दहशतवाद्यांच्या पाठिशी उभे आहेत.
लष्कर-ए-तैयबाच्या एका बैठकीदरम्यान टॉप कमांडर सैफुल्लाह कसून याने देखील लष्कराकडे थेट मागणी केली होती. त्याने म्हटले होते की, आम्हाला डॉक्टर किंवा इंजिनियर्सची गरज नाही, शरीयत कायदा लागू करा, तालिबान शैलीच्या लढाऊंची आम्हाला गरज आहे. अहवालानुसार, कसून पाकिस्तानच्या राजकारणातही सक्रिय होऊ लागला आहे. हे पाकिस्तानच्या लोकशाही जनतेसाठीच नव्हे, तर भारतासाठी देखील एक मोठे संकट मानले जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान सध्या अंतर्गत युद्धात, आर्थिक संकटात अडकलेला आहे. तसेच पाकिस्तानच्या जनतेमध्ये सरकार आणि लष्कराविरोधातही रोष वाढत आहे. या समस्यांवरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठीच जाणीवपूर्वक भारत आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. दहशतवाद्यांना लष्कराचे संरक्षणही दिले जात आहे. यामुळे हल्ल्याची शक्यता देखील तितकीच वाढली आहे. सध्या याच पार्श्वभूमीवप भारतीय लष्कर सतर्क झाले असून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यास तयार आहे.
पाकिस्तानात शिजतोय भारतवरोधी नवा कट? Operation Sindoor चा बदला घेण्यासाठी दहशवाद्यांची गुप्त बैठक






