'अल-कायदा, लश्कर-ए-तोयबा, जैश हे मानवतेचे शत्रू आहेत', भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला फटकारले, त्याचा कपटीपणा उघड केला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानची पुन्हा एकदा जोरदार कोंडी केली आहे. भारताने जागतिक स्तरावर (India At UN) धुमाकूळ घालणाऱ्या अल-कायदा, लश्कर-ए-तोयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) या कुख्यात दहशतवादी संघटनांचा उल्लेख करत त्यांना थेट “मानवतेचे राक्षस” (Monster of Humanity) असे संबोधले. जागतिक शांतता आणि सुरक्षेला असलेला धोका टळावा यासाठी केवळ दहशतवाद्यांचा खात्मा करून चालणार नाही, तर त्यांना सुरक्षित आश्रयस्थान पुरवणारी आणि त्यांची पाठराखण करणारी संपूर्ण यंत्रणाच पाडून टाकणे आवश्यक आहे, असे आक्रमक आवाहन भारताने जागतिक समुदायाला केले आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पर्वथनेनी हरीश यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बोलताना ९/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या केल्या. ९/११ नंतर जागतिक समुदायाने दहशतवादाविरुद्ध एकत्र येत लढा दिला असला, तरी अल-कायदासारख्या संघटनांचे जाळे केवळ अफगाणिस्तानच्या सीमांपुरते मर्यादित राहिले नव्हते, हे त्यांनी स्पष्ट केले. या दहशतवादी संघटनांनी अफगाणिस्तानच्या पलीकडे जाऊन ज्या भागात आपले मजबूत पाय रोवले, तो भाग म्हणजे पाकिस्तान होता, जिथे राज्यकर्त्यांच्या आणि लष्कराच्या छत्रछायेखाली त्यांना आश्रय मिळाला, असा थेट रोख भारताने आपल्या भाषणातून दाखवून दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Syria Parliament Decision: सीरियाच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय; असाद-कालीन वादग्रस्त ‘दहशतवाद न्यायालय’ पूर्णपणे रद्द
भारतीय राजदूत पर्वथनेनी हरीश यांनी आपल्या भाषणात ९/११ च्या कटकारस्थानातील मुख्य सूत्रधारांचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, जगभरात दहशत पसरवणारे हे गुन्हेगार कोणत्याही दुर्गम डोंगरदऱ्यांमध्ये किंवा गुहांमध्ये लपलेले फरारी नव्हते. ९/११ च्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड आणि अल-कायदाप्रमुख ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानातील ॲबोटाबाद या लष्करी छावणीजवळील एका अत्यंत सुरक्षित, तटबंदी असलेल्या महालात राहत होता. अमेरिकेने ‘ऑपरेशन नेपच्यून स्पीअर’ राबवून त्याचा तिथेच खात्मा केला होता.
India 🇮🇳 told the UN that 9/11 plotters, including Osama bin Laden, were found in Pakistan 🇵🇰 not in “caves.” India warned that the same “sanctuary” continues to shelter Lashkar-e-Taiba and Jaish-e-Mohammed. Indian Ambassador P. Harish pic.twitter.com/cDekBRrvD8 — برهان الدین | Burhan uddin (@burhan_uddin_0) September 17, 2026
credit – social media and Twitter
याशिवाय, या भीषण कटाची रणनीती आखणारा खालिद शेख मोहम्मद हा पाकिस्तानातील एका नागरी भागातील खाजगी अपार्टमेंटमध्ये लपलेला आढळला होता. तर अपहरणकर्त्यांच्या गटात सामील होण्यासाठी व्हिसा नाकारला गेलेला आणि संपूर्ण मोहिमेत समन्वय साधणारा रमझी बिन अल-शिभ हादेखील पाकिस्तानातील शहरी वस्तीत मोकळेपणाने वावरत होता. हे सर्व पुरावे स्पष्ट करतात की, जगाच्या डोळ्यात धूळ फेकत पाकिस्तानने या भीषण दहशतवाद्यांना आपल्या भूमीत कसे सुरक्षित ठेवले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध
भारताने स्पष्ट शब्दात सांगितले की, ज्या भागांमध्ये ९/११ च्या सूत्रधारांना वर्षानुवर्षे राजाश्रय मिळाला, त्याच प्रदेशातून आज लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटना आपले जाळे पसरवत आहेत. हे दहशतवादी आजही भारतासह जगभरात हिंसक कारवाया करण्यासाठी त्याच परिसंस्थेचा वापर करत आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि अशा रानटी प्रवृत्तीच्या लोकांना पोसणाऱ्या या संपूर्ण घाणीला (Ecosystem) मुळासकट उपटून टाकल्याशिवाय जगात खरी शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे ठाम प्रतिपादन भारताने केले. भारताच्या या स्पष्ट आणि थेट भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचा कपटीपणा आणि दहशतवादाला दिला जाणारा पाठिंबा पुन्हा एकदा उघडा पडला आहे.






