
नवी दिल्ली : २३ ऑगस्ट १९९७ मध्ये हळदीच्या पेटंटबाबत (Turmeric Patent) अमेरिकेशी (USA) चालू असलेला कायदेशीर लढा भारताने (India Win) जिंकला आहे. एखाद्या विकसनशील देशाने (Developing Country) अमेरिकन पेटंटला (American Patent) आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे. मिसिसिपी विद्यापीठामधील (Mississippi University) दोन संशोधकांना हळदीने जखम बरी (Heal The Wound) करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळाले. त्यानंतर हळदीसाठी भारत आणि अमेरिका एकमेकांसमोर उभे राहिले. अखेर हा लढा जिंकत हळद ही भारताचीच असल्याचे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.
भारताकडून हा खटला भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने लढला. भारताने दावा केला होता की, हळदीचे अँटिसेप्टिक गुणधर्म भारताच्या पारंपरिक ज्ञानात येतात आणि त्यांचा उल्लेख भारताच्या आयुर्वेदिक ग्रंथातही आहे. यानंतर पीटीओने २३ ऑगस्ट १९९७ मध्ये दोन्ही संशोधकांचे पेटंट रद्द केले. भारतीय शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा लढा
मिसिसिपी विद्यापीठामधील दोन संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळाले. त्यामुळे डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी धक्काच बसला. माशेलकर दिल्लीमध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदचे (CSIR) संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यांना हळदीचा हा गुणधर्म भारतातील लोकांना हे पेटंट फाईल होण्याआधीपासून माहित होता हे सिद्ध करणे गरजेचे होते. सीएसआयआरने त्यासाठी तब्बल ३२ संदर्भ शोधून काढले. त्यामुळे हे पेटंट अमेरिकन पेटंट ऑफिसने नाकारले आहे.
अमेरिकेतील भारतीय शास्त्रज्ञ भारताविरोधात
हा खटला लढण्यासाठी सीएसआयआरने त्यावेळी अमेरिकन वकिलाची नेमणूक केली होती. या केससाठी तब्बल १५ हजार डॉलर्स खर्च केले. सीएसआयआरने कागदपत्रे केलेली कागदपत्रे सायन्स जर्नल आणि पुस्तकांमध्ये प्रकाशित झाली होती. याच कागपत्रांमुळे भारताची बाजू भक्कम झाली. मात्र, हळदीचे पेटंट अमेरिकेत फाईल करणारे संशोधक हरिहर कोहली आणि सुमन दास हे दोघेही भारतीय होते. अमेरिकन पेटंट कार्यालयात ते तपासणारा कुमार हा पेटंट परीक्षकही भारतीयच होता. तर, या अमेरिकी भारतीयांविरोधात लढली भारतातली सीएसआयआर ही संस्था होय.