Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतासाठी दिलासा! होर्मुझच्या ‘डेथ झोन’मधून दोन तेलवाहू जहाजांची सुरक्षित सुटका; नौदलाकडून कडेकोट सुरक्षा

India Oil Ships : मध्यपूर्वेतील तणावादरम्यान भारताची दोन तेलवाहू जहाजे होर्मुझ खाडीतून सुरक्षित बाहेर पडली आहेत. सध्या ही जहाजे पर्शियन आखातात असून त्यांच्यावर भारतीय नौदलाची कडेकोट सुरक्षा तैनात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 28, 2026 | 02:32 PM
India's Two Oil Tankers Safely Navigated Through Hormuz

India's Two Oil Tankers Safely Navigated Through Hormuz

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतासाठी दिलासादायक बातमी
  • होर्मुझच्या ‘डेथ झोन’मधून दोन भारतीय जहाजांची सुरक्षित सुटका
  • भारतीय नौदलाकडून कडेकोट सुरक्षा
India’s Two Oil Tankers Safely Navigated Through Hormuz :  नवी दिल्ली : गेल्या एक महिन्यांपासून मध्यपूर्वेत प्रचंड तणावाचे वातावरण आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध (US-Israel VS Iran War) सुरुच आहे. यामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा तेलवाहतूकीचा मार्ग होर्मुझ बंद झाला आहे. परिणामी जागतिक स्तरावर इंधन आणि उर्जा संकट उभे राहिले आहे. पण या संकटादरम्यान भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक वृत्त आहे. भारताची दोन तेलवाहू व्यापारी जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी (Strait Of Hormuz) सुरक्षितपणे पार पडली आहे.

इंधन तुटवड्याच्या अफवा आणि इराण युद्धाचे सावट; पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, ‘या’ मॉडेलवर भर

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम पदार्थांनी भरलेली दोन भारतीय व्यापारी जहाजे ‘होर्मुझची सामुद्रधुनीतून बाहेर पडली आहेत. सध्या ही जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली असून नौदलाच्या कडेकोट सुरक्षेत आहेत. भारताच्या ‘ऑपरेशन संकल्प’ अंतर्गत जहाजांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय नौदल पर्शियन गल्फ आणि ओमानच्या आखातात तैनात करण्यात आले होते.

नौदलाचे अधिकारी ड्रोन आणि सॅटेलाइटच्या माध्यमातून या मार्गावर २४ तास लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जहाजांना मदत करण्यासाठी ‘मार्कोस’ (MARCOS) कमांडो आणि तांत्रिक पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. आणखी काही जहाजे या मार्गावरुन नौदलाच्या सुरक्षेत बाहेर पडतील असे सरकारने म्हटले आहे.

भारताचा कुटनीतिक विजय

भारताला इराण(Iran)कडून मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु हा भारताचा कुटनीतिक विजय मानला जात आहे. युद्ध सुरु झाल्यापासून भारत सतत इराणच्या संपर्कात आहे. भारताने इराणला संयम बाळगण्यास सांगितले आहे तर भारतीय जहाजांच्या सुरक्षेचीही मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्री मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी चर्चा केली होती.

ज्यानंतर इराणने भारत आणि इतर ४ मित्र राष्ट्रांसाठी होर्मुझचा मार्ग खुला केला. हा भारतासाठी मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, भारतासारख्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्यास कोणताही अडथळा येणार नाही.

भारतासाठी का महत्त्वाचा आहे होर्मुझ?

भारताची ८० टक्के उर्जा संसाधने होर्मुझच्या मार्गावरुन आयात केली जातात. देशांतर्गत एलपीजी, डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून हा मार्ग खुला असणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या या मार्गावर सुरु असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत इंधन दर वाढण्याची शक्यता आहे. पण या संकटाच्या काळात इराणने भारताला दिलेल्या सवलतीमुळे इंधन दर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

US-Israel Iran War: युद्धाच्या काळात भारताचा मोठा डाव! थेट अमेरिकेच्या शत्रूसोबत करार, Donald Trump काही करु शकणार नाही…

💡

Frequently Asked Questions

  • Que: होर्मुझ सामुद्रधुनी भारतासाठी किती महत्त्वाची आहे?

    Ans: होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातली सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूकीचा मार्ग आहे. या मार्गावरुन भारताचे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी यांसारख्या उर्जा संसाधनांचे मोठ्या प्रमाणावर आयात होते. यामुळे हा मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

  • Que: होर्मुझमधून तेल आणि गॅस जहाजे सुरक्षित आणण्यासाठी भारताने काय पावले उचलली आहेत?

    Ans: होर्मुझमधून तेल आणि गॅस जहाजे सुरक्षित आणण्यासाठी भारत सरकारने इराणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. एस. जयशंकर यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली असून भारतीय जहाजांना होर्मुझ मार्ग खुला करण्यात आला आहे. तर दुसरीकडे जहाजे होर्मुझमधून सुरक्षित बाहेर आल्यानंतर फासरच्या आखातात नौदल सैन्याच्या निगराणीत ठेवण्यात आली आहेत.

  • Que: इराणने कोणत्या देशांसाठी होर्मुझचा मार्ग खुला केला आहे?

    Ans: इराणने भारतासह चीन, रशिया, यांसारख्या मित्र राष्ट्रांसाठी होर्मुझचा मार्ग खुला केला आहे. परंतु या देशांच्या जहाजांना इराणशी समन्वय साधून क्लिअरन्स मिळवणे आवश्यक असल्याचे IRGC ने म्हटले आहे.

Web Title: Indias two oil tankers safely navigated through hormuz death zone under tight naval security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Iran News
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Missile Technology : चीनच्या हाती लागला ‘विनाशकारी’ खजिना; जमिनीखालून निघाले क्षेपणास्त्र बनवणारे 17 गूढ दुर्मिळ धातू
1

Missile Technology : चीनच्या हाती लागला ‘विनाशकारी’ खजिना; जमिनीखालून निघाले क्षेपणास्त्र बनवणारे 17 गूढ दुर्मिळ धातू

War Alert: आता युद्धाची वेळ! अमेरिकेच्या छातीवर रशिया आणि इराणचे ‘300’ ड्रोन तैनात; ट्रम्पचा क्युबाला थेट लष्करी कारवाईचा इशारा
2

War Alert: आता युद्धाची वेळ! अमेरिकेच्या छातीवर रशिया आणि इराणचे ‘300’ ड्रोन तैनात; ट्रम्पचा क्युबाला थेट लष्करी कारवाईचा इशारा

Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू
3

Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

China Earthquake : चीनमध्ये लोक गाढ झोपेत असतानाच भूकंपाचा महाभयंकर प्रहार; हाँगकाँगही हादरले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
4

China Earthquake : चीनमध्ये लोक गाढ झोपेत असतानाच भूकंपाचा महाभयंकर प्रहार; हाँगकाँगही हादरले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.