पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, 'या' मॉडेलवर भर (Photo Credit- X)
पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात पेट्रोल-डिझेल संपणार असल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठल्या आहेत. या अफवांमुळे अनेक राज्यांमध्ये पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. काही नागरिक भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन मोठ्या टाक्यांमध्ये डिझेल भरून साठवणूक करत आहेत. यामुळे गरजू ग्राहकांना इंधन मिळणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, देशात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही आणि साठा पुरेसा आहे.
PM Narendra Modi is chairing the meeting with CMs through video conferencing on the West Asia conflict to review preparedness and plans of states. pic.twitter.com/pqJS3iCgro — ANI (@ANI) March 27, 2026
Lockdown India: देशात पुन्हा लॉकडाऊन? सोशल मीडियावरील अफवांवर केंद्र सरकारचा मोठा खुलासा
भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा कच्च्या तेलाच्या स्वरूपात पश्चिम आशियाई देशांतून आयात करतो. एलपीजी (LPG) आणि पीएनजी (PNG) साठीही आपण याच देशांवर अवलंबून आहोत. कच्च्या तेलाचे टँकर प्रामुख्याने ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’ (Strait of Hormuz) मधून येतात. युद्धामुळे या मार्गावर टँकर्सच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, इराणने भारताकडे येणाऱ्या टँकर्सना या मार्गावरून जाण्यासाठी विशेष सवलत दिली आहे, ज्यामुळे पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला नाही.
पंतप्रधान मोदींनी या संकटाचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा ‘टीम इंडिया’ मॉडेलचा मंत्र दिला आहे. कोरोना महासाथीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी ज्या प्रकारे एकत्रितपणे काम केले होते, तशीच रणनीती आताही वापरली जाणार आहे. राज्यांना आवश्यक त्या प्रमाणात इंधन आणि गॅसचा पुरवठा सुनिश्चित करणे. मिळालेल्या इंधनाचे जनतेमध्ये सुयोग्य वितरण करणे आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर वचक बसवणे. कोरोना काळात औषधे आणि मास्कवर भर होता, आता इंधन आणि एलपीजीच्या उपलब्धतेवर लक्ष केंद्रित केले जात आहे “इराण युद्धाने निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला कोरोनाकाळाप्रमाणेच संघटित होऊन काम करावे लागेल,” असे आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केले.






