Indonesia's press freedom under threat after gruesome threats to magazine
जकार्ता: इंडोनेशियात पुन्हा एकदा मीडियाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियंतो यांच्या राष्ट्रीय धोरणांवर टीका करणाऱ्या एका मॅगझिनला धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका डुकराचे आणि उंदराचे कापलेले धड या मॅगझिनच्या कार्यालयात पाठवण्यात आले आहे. ही घटना इंडोनेशियातील प्रेस स्वातंत्र्यावर दबाव आणणारी आणि पत्रकारांसाठी धोकादायक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियातील सर्वोच्च साप्ताहिकापैकी एक मॅगझिन म्हणजे टेम्पो आहे. या मॅगझिनने नुकतेच प्रकाशित केलेल्या एका अहवालामध्ये, राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियंतो यांच्या धोरणांवर टीका केली आहे. मीडियो रिपोर्टनुसार, शनिवारी (22 मार्च) टेम्पोच्या कार्यलयात एक मेलेल्या उंदरांचे बॉक्स सापडले, तसेच डुकराचे कापलेले तुकडे देखील पाठवण्यात आहे. हे सगळे करण्यामागे कोण आणि याचा हेतू काय हे लक्षात आलेले नाही, मात्र ही घटना प्रेसच्या स्वातंत्र्यासाठी अंत्यंत धोकादायक आणि गंभीर चिंतेची मानली जात आहे.
या घटनेवर राष्ट्राध्यक्षांच्या विरोधी कार्यकर्त्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया आल्या आहेत. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट्स सारख्या संघटनांनी देखील याचा चीव्र निषेध केला आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडोनेशियाचे संचालक यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इंडोनेशियात पत्रकार असणे हे मृत्यूदंडासारखे आहे. त्यांनी या घटनेच्या तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट्सचे प्रमुख बेह लिह यी यांनी या घटनेला, धोकादायक आणि जाणूनबूजून केलेले कृत्य म्हटले आहे.
टेम्पो मासिकाच्या संपादक सेत्री यासारा यांनी या धमकीला उत्तर देताना म्हटले आहे की, ही धमकी त्यांच्या कार्याला कमकुवत करण्याच्या हेतून देण्यात आली आहे, मात्र मासिक आपल्या धेय्याशी पूर्णपणे वचबद्ध राहिल, कोणत्याही धमकीला घाबरणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या धमकीचा हेतू घाबरवण्याचा असेल तर आम्ही घाबरणार नाही, परंतु हे भ्याड कृत्य थांबवले पाहिजे. सध्या या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियंतो यांच्या प्रवक्त्याने या घटनेकडे दुर्लक्ष करत म्हटले आहे की, ‘फक्त डुकराचे डोके शिजवा’. त्यांनी हेही म्हटले आहे की, मीडियाच्या स्वातंत्र्याला आळा घालणे महत्वाचे आहे. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे इंडोनेशियातील स्वातंत्र्य आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
टेम्पो मासिकाने प्रकाशित केलेल्या लेखात राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांवर केलेल्या टीकांनी मोठा गोंधळ उडाला आहे. या टीकांमध्ये व्यापक अर्थसंकल्पीय कपातीचा मुद्दावर टीका करण्यात आली आहे, या मुद्द्यावरुन इंडोनेशियात निदर्शने झाली आहेत. या घटनेमुळे इंडोनेशियातील पत्रकार आणि सरकारमधील वाढता तणाव आणखी वाढला आहे.