US Iran Talks Fails : इकडे चर्चा फेल अन् तिकडे ५० गुप्तहेरांना अटक; इराणची अमेरिका-इस्रायलविरोधात मोठी कारवाई (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
Trump Warns China : इराणला मदत करणं चीनला पडणार महागात; ट्रम्प यांनी दिला ड्रॅगनला थेट इशारा
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका (America) आणि इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली इराणने ५० जणांना अट केली आहे. अल जजीरा आणि इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या गुप्तहेरांना फाशीची शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे. इराणच्या सुरक्षा दलांनी देशभर शोधमोहीम राबवली होती. या मोहिमेंतर्गत संशयित हेरांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गंभीर आरोप ठोठवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या गुप्तहेरांवर इराणमधील लष्करी तळे, पायाभूत सुविधा आणि महत्त्वपूर्ण माहिती चोरून शत्रू राष्ट्रांना पुरवल्याचा आरोप आहे. या गुप्तहेरांना इस्रायल आणि अमेरिकेला इराणमधील महत्त्वाच्या ठिकाणांचे ‘लोकेशन’ देऊन हल्ल्यांसाठी केल्याचे इराणने म्हटले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या लोकांकडून सॅटेलाईट उपकरणे, प्रगत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
इराणमध्ये हेरगिरी आणि देशद्रोहासाठी अत्यंत कठोर कायदे असून पकडण्यात आलेल्या लोकांना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यात इराणने अशाच प्रकारच्या आरोपांखाली अनेकांना सार्वजनिकपणे फाशी दिली आहे. ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे. जेव्हा अमेरिका इराण मधील शांतता चर्चा अयशस्वी ठरली आहे.
इराणच्या मते, अमेरिकेच्या अटी अत्यंत जाचक आणि कठोर होत्या. अमेरिकेच्या तटस्थ भूमिकेमुळेच कोणताही शांतता करार होऊ शकला नाही. तसेच इराणने म्हटले की, त्यांच्या मागण्यांना अवास्तव ठरवण्यात आले आहे. या अटकेमुळे आणि चर्चेच्या असफलतेमुळे आखाती देशांमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. यामुळे अमेरिका आणि इराण संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait Of Hormuz) मार्ग पुन्हा एकदा बंद केला आहे. यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. जगावर इंधन आणि उर्जा संकट उभे ठोकले आहे. पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरात महागाईचा भडका उडू शकतो.
US Iran Peace Talks : ‘या’ एका अटींमुळे फिस्कटली शांतता चर्चा; इराणचे अमेरिकेवर गंभीर आरोप, म्हणाला…






