
iran closed strait of hormuz global oil crisis impact on india petrol diesel price
Iran closed Strait of Hormuz latest news : मध्यपूर्वेतील युद्ध आता केवळ जमिनीवर किंवा हवेत मर्यादित राहिलेले नाही, तर ते समुद्रात पोहोचले आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर(US-Israel Attacks Iran), इराणने जगाला सर्वात मोठा झटका दिला आहे. इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद करण्याचा ऐतिहासिक आणि धोकादायक निर्णय घेतला आहे. हा केवळ एक समुद्री मार्ग नसून जगाची आर्थिक नाडी आहे. हा मार्ग बंद होणे म्हणजे जगाच्या एकूण तेल पुरवठ्याचा एक चतुर्थांश भाग ठप्प होणे होय. इराणच्या या पावलामुळे जागतिक स्तरावर हाहाकार माजला असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी हा पर्शियन आखात आणि हिंद महासागर यांना जोडणारा एक अत्यंत अरुंद पण महत्त्वाचा जलमार्ग आहे. सुमारे १६१ किलोमीटर लांब असलेल्या या मार्गाची रुंदी काही ठिकाणी केवळ ३३ किलोमीटर आहे, तर जहाजांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली लेन फक्त ३.२ किलोमीटर रुंद आहे. या मार्गाच्या उत्तरेला इराण आहे, तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) आहेत. इराणचे भौगोलिक स्थान या मार्गावर इतके प्रभावी आहे की, ते तेथून सहजपणे जगाची जहाजे रोखू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ayatollah Ali Khamenei: शिया राजकारणाचा मेरुमणी कोसळला; इराणला अण्वस्त्रशक्ती बनवणाऱ्या ‘अदृश्य’ सम्राटाचा ‘असा’ होता जीवनप्रवास
होर्मुझच्या सामुद्रधुनीचे महत्त्व यावरून समजते की, जगातील दररोजच्या तेल व्यापारापैकी सुमारे २० दशलक्ष बॅरल कच्चे तेल या मार्गावरून जाते. सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि युएई यांसारखे ओपेक (OPEC) सदस्य देश आशियाई बाजारपेठांमध्ये (विशेषतः भारत, चीन, जपान) तेल पाठवण्यासाठी याच मार्गावर अवलंबून आहेत. इतकेच नाही तर कतार आपला संपूर्ण लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) याच मार्गाने निर्यात करतो. हा मार्ग बंद झाल्याने केवळ तेलाचा तुटवडाच निर्माण होणार नाही, तर वाहतूक खर्च वाढल्याने जगभरात महागाईचा भस्मासुर बाहेर येईल.
🚨 STRAIT OF HORMUZ SHUTDOWN COULD BE THE GLOBAL MARKETS’ BLACK SWAN TRIGGER 🚨 If that 21-mile choke point slams shut right now (and reports say shipping is already halting post-strikes), forget gradual moves. This is instant supply shock territory. 20% of world oil (20M+… pic.twitter.com/irhOI7ROne — Merlijn The Trader (@MerlijnTrader) March 1, 2026
credit – social media and Twitter
इराणने केवळ मार्ग बंद केला नाही, तर तिथे ३,००० हून अधिक कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा (Short Range Missiles) पहारा लावला आहे. इराणकडे २०० ते २५० किमी पल्ल्याची अशी क्षेपणास्त्रे आहेत, जी अमेरिकन नौदलाच्या जहाजांना किंवा व्यावसायिक टँकर्सना सहज टार्गेट करू शकतात. लष्करी विश्लेषकांच्या मते, इराणने दीर्घकालीन युद्धाची तयारी केली आहे. जर अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील राजवट बदलण्याचा प्रयत्न केला, तर इराण रशिया आणि चीनच्या मदतीने हा समुद्री मार्ग कायमचा बंद ठेवू शकतो, ज्यामुळे पाश्चात्य देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Israel-Iran War: ‘Black Tomahawk’ युद्धातील अदृश्य शिकारी; रडारलाही न सापडणाऱ्या अमेरिकन ब्रह्मास्त्राची ‘अशी’ थरारक कहाणी
भारतासाठी ही बातमी धोक्याची घंटा आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८०% पेक्षा जास्त तेल आयात करतो आणि त्यातील मोठा हिस्सा याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो. जर हा मार्ग बंद राहिला तर भारतात इंधन टंचाई निर्माण होईल, मालवाहतूक महाग होईल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागेल. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हणूनच या वादात मध्यस्थी करण्याचा आणि संवाद सुरू करण्याचा आग्रह धरला आहे.
Ans: भारताची तेल आयात विस्कळीत होईल, ज्यामुळे पेट्रोल-डिझेल महाग होईल आणि महागाई प्रचंड वाढेल.
Ans: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण करण्यासाठी इराणने हा मार्ग बंद केला.
Ans: जगातील एकूण समुद्री तेल निर्यातीपैकी सुमारे २० दशलक्ष बॅरल (२५% तेल) दररोज या मार्गावरून जाते.