Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait of Hormuz toll : आमच्या समुद्रात आमचेच नियम! होर्मुझमध्ये इराणचे ’12-कलमी’ चक्रव्यूह; शत्रू राष्ट्रांची रसदच तोडणार

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या संसदेत १२-कलमी ठरावाचा मसुदा तयार केला आहे. इस्रायल आणि त्याच्या शेजारील देशांच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली जाणार...

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 22, 2026 | 03:15 PM
iran drafts 12 point resolution to control strait of hormuz israel ships banned 2026

iran drafts 12 point resolution to control strait of hormuz israel ships banned 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणची ‘सागरी’ नाकेबंदी
  • २० टक्के मालाची जप्ती
  • भारताला दिलासा

Iran 12-point resolution Hormuz 2026 : जागतिक व्यापाराचा श्वास रोखून धरण्याची ताकद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) आता इराणचा अधिकृत ‘टोल नाका’ सुरू होणार आहे. इराणच्या संसदेने एक असा १२-कलमी ऐतिहासिक आणि वादग्रस्त मसुदा तयार केला आहे, जो जागतिक सागरी सुरक्षेची समीकरणे पूर्णपणे बदलून टाकेल. या नव्या नियमांमुळे इस्रायल आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, इराणने आता समुद्रातही आपली लष्करी आणि कायदेशीर ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे.

इस्रायल आणि मित्र राष्ट्रांसाठी समुद्राचे दरवाजे बंद?

इराणच्या या नव्या मसुद्यानुसार, इस्रायल आणि ग्रीस, संयुक्त अरब अमिरात (UAE) तसेच सोमालीलँड यांसारख्या इस्रायल समर्थक देशांच्या जहाजांना आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणे कठीण होणार आहे. अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांनाही या मार्गावरून जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. जर या देशांना आपली जहाजे चालवायची असतील, तर त्यांना इराणच्या ‘सर्वोच्च परिषदेची’ विशेष परवानगी घ्यावी लागेल. थोडक्यात, इराणने या महत्त्वाच्या सागरी मार्गावर आपली ‘कायदेशीर नाकेबंदी’ जाहीर केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Meloni Insult : ‘तू मूर्ख आणि नीच स्त्री!’ रशियाच्या सरकारी टीव्हीवर जॉर्जिया मेलोनींचा भीषण अपमान; Russia-Italyमध्ये वाजलं

२० टक्के माल जप्त: इराणची नवीन ‘वसुली’ रणनीती

या प्रस्तावातील सर्वात धक्कादायक आणि जाचक अट म्हणजे ‘माल जप्ती’. जर एखाद्या जहाजाने इराणने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले, तर ते जहाज तात्काळ जप्त करून इराणच्या बंदरात नेले जाईल. तिथे त्या जहाजावरील एकूण मालापैकी २० टक्के माल जप्त केला जाईल. ही जप्ती सीमा शुल्क (Customs) म्हणून दाखवली जाईल आणि त्यानंतरच त्या जहाजाला पुढे जाण्याची परवानगी मिळेल. इराणच्या या पावलामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

🚨⚡️NOW The Islamic Revolutionary Guard Corps opened fire on ships in the Strait of Hormuz that attempted to “break the blockade”! 🇮🇷🔥 Iranian media: Direct gunfire targeting the Swiss vessel MSC Francesca and two other ships (Greek and Emirati) after they turned off their… pic.twitter.com/BB69vqq74X — RussiaNews 🇷🇺 (@mog_russEN) April 22, 2026

credit – social media and Twitter

इराणी रियालमध्ये टोल आणि ‘स्पेलिंग’ची सक्ती

इराणचे खासदार मोहम्मद रझा रझायी कूची यांच्या मते, यापुढे होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांना इराणच्या चलनात म्हणजे ‘इराणी रियाल’मध्ये टोल भरावा लागेल. या टोलची रक्कम जहाजाचा आकार आणि त्यातील मालानुसार ठरवली जाईल. विशेष म्हणजे, शत्रू राष्ट्रांची व्याख्या विचारली असता कूची यांनी एक विचित्र विधान केले. ते म्हणाले, “जे देश ‘पर्शियन गल्फ’ (Persian Gulf) या नावाचे स्पेलिंग बरोबर लिहीत नाहीत, ते आमचे शत्रू आहेत.” इराणने या माध्यमातून आपल्या अस्मितेचा मुद्दा जागतिक व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iceman Promo : ड्रेकचा ‘कूल’ स्टंट! भर उन्हात शहरात अवतरला हिमनग; बर्फ वितळताच आत मोठं सरप्राइज, पाहा VIDEO

भारताला झुकते माप: ओमानच्या मार्गाचे आव्हान

या वादळात भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. इराणने आपल्या ‘मित्र’ देशांच्या यादीत भारत आणि चीनचा समावेश केला असून, त्यांच्या जहाजांकडून कोणताही टोल घेतला जाणार नाही. दुसरीकडे, ओमानच्या सीमेजवळून जाणाऱ्या जहाजांनाही सवलत आहे, पण तिथला समुद्र अत्यंत उथळ असल्याने मोठी जहाजे तिथून नेणे अशक्य आहे. त्यामुळे जगाला पर्याय नसून इराणच्या अटींनुसारच वागावे लागेल, अशी ही एकूण परिस्थिती आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणचा होर्मुझसाठीचा नवीन १२-कलमी मसुदा काय आहे?

    Ans: हा इराणच्या संसदेने तयार केलेला ठराव असून, याद्वारे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कायदेशीर नियंत्रण मिळवून शत्रू राष्ट्रांच्या जहाजांकडून टोल वसूल करणे आणि त्यांच्यावर बंदी घालणे हा मुख्य उद्देश आहे.

  • Que: नियमांचे उल्लंघन केल्यास इराण काय शिक्षा देणार आहे?

    Ans: नियमांचा भंग करणाऱ्या जहाजाला जप्त करून त्यातील २० टक्के माल सीमा शुल्क म्हणून इराण उतरवून घेणार आहे.

  • Que: भारतीय जहाजांना या नियमांमुळे टोल भरावा लागेल का?

    Ans: नाही, इराणने भारत आणि चीन यांसारख्या मित्र राष्ट्रांना या टोलमधून आणि जाचक अटींमधून सवलत दिली आहे.

Web Title: Iran drafts 12 point resolution to control strait of hormuz israel ships banned 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • iran
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Rajnath Singh : ‘वेळ आली की भारत करून दाखवेल’; राजनाथ सिंह यांनी इराण-अमेरिका संघर्षात भारताच्या भूमिकेवरून दिले मोठे संकेत
1

Rajnath Singh : ‘वेळ आली की भारत करून दाखवेल’; राजनाथ सिंह यांनी इराण-अमेरिका संघर्षात भारताच्या भूमिकेवरून दिले मोठे संकेत

US-Iran War: युद्ध थांबलं नाही! ट्रम्प यांनी हात पुढे केला, पण इराणने होर्मुझमध्ये ‘ट्रिगर’ दाबला, UKMTO Shipवर अंधाधूंद गोळीबार
2

US-Iran War: युद्ध थांबलं नाही! ट्रम्प यांनी हात पुढे केला, पण इराणने होर्मुझमध्ये ‘ट्रिगर’ दाबला, UKMTO Shipवर अंधाधूंद गोळीबार

Iran Slams Pakistan : पाकिस्तानचा ‘डबल गेम’ उघड! इराणने Asim Munir ला म्हटलं अमेरिकन पोस्टमन, एका चुकीमुळे वातावरण तापलं
3

Iran Slams Pakistan : पाकिस्तानचा ‘डबल गेम’ उघड! इराणने Asim Munir ला म्हटलं अमेरिकन पोस्टमन, एका चुकीमुळे वातावरण तापलं

VIRAL VIDEO: इराणचा ‘खोरमशहर’ प्रहार! क्षेपणास्त्रे घेऊन रिव्होल्यूशनरी गार्ड्स रस्त्यावर; ट्रम्पचा इशारा अन् अनपेक्षित सीझफायर
4

VIRAL VIDEO: इराणचा ‘खोरमशहर’ प्रहार! क्षेपणास्त्रे घेऊन रिव्होल्यूशनरी गार्ड्स रस्त्यावर; ट्रम्पचा इशारा अन् अनपेक्षित सीझफायर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.