Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi Aramco: जगाची ‘ऑईल बॅंक’ धुराच्या गर्तेत! इराणने सौदीच्या सर्वात मोठ्या रिफायनरीला केलं भस्मसात; जागतिक बाजाराला फटका

Saudi Aramco Attack : सौदी अरामकोच्या रास तनुरा रिफायनरीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला आहे. या हल्ल्याचा आरोप इराणवर करण्यात आला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 02, 2026 | 03:14 PM
iran drone attack on saudi aramco ras tanura refinery global oil crisis

iran drone attack on saudi aramco ras tanura refinery global oil crisis

Follow Us
Close
Follow Us:
  • जागतिक तेल संकट
  • तातडीने रिफायनरी बंद 
  • सूडाचे राजकारण

Saudi Aramco Ras Tanura refinery attack 2026 : मध्यपूर्वेतील युद्ध आता केवळ सीमेपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्याने जगाची ‘लाईफलाईन’ समजल्या जाणाऱ्या तेल पुरवठ्यावर घाला घातला आहे. सोमवारी पहाटे सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामको (Saudi Aramco) हिच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘रास तनुरा’ (Ras Tanura) रिफायनरीवर इराणने ड्रोनद्वारे भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर रिफायनरीच्या परिसरात आगीचे गोळे आणि धुराचे लोट पाहिला मिळाले, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रास तनुरा: जगाचे तेल केंद्र धुराच्या गर्तेत

रास तनुरा हे केवळ सौदी अरेबियाचेच नव्हे, तर जगातील सर्वात मोठे तेल निर्यात केंद्र आणि रिफायनरी कॉम्प्लेक्स मानले जाते. इराणच्या ड्रोनने या केंद्राला लक्ष्य केल्यामुळे सौदी प्रशासनाने तातडीने संपूर्ण रिफायनरी बंद करण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने, अग्निशमन दलाने तत्परता दाखवल्यामुळे आग एका मर्यादित भागातच रोखण्यात यश आले. सुरुवातीच्या वृत्तानुसार, यामध्ये कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही, परंतु तांत्रिक बिघाड आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव रिफायनरी बंद झाल्याने सौदीच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: ‘आम्हीच पाडलं, हिंमत असेल तर रोखा!’ इराणच्या इशाऱ्याने खळबळ; कुवेतमध्ये अमेरिकन F-15 फायटर जेटची राख

इराणचा ड्रोन स्ट्राईक आणि जागतिक पडसाद

अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना लक्ष्य करण्याची शपथ घेतली होती. सौदी अरेबियावर झालेला हा हल्ला त्याच रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे. इराणने डागलेले ड्रोन हे अत्यंत प्रगत असून त्यांनी सौदीची संरक्षण यंत्रणा भेदून रिफायनरीला धडक दिली. या हल्ल्यामुळे अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये खलबतं सुरू झाली असून, सौदी आता इराणवर प्रतिहल्ला करणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

♦️ دوشنبه ۱۱ اسفند ۱۴۰۴ – حمله پهبادی تروریست‌های جمهوری اسلامی به پالایشگاه نفت رأس التنوره عربستان سعودی #آرامکو
​♦️ Monday, March 2, 2026 – Drone attack by Islamic Republic terrorists on the Ras Tanura oil refinery in Saudi Arabia #Aramco #أرامكو_السعودية pic.twitter.com/1uPWf7T0YJ
— Siamak Tadayon Tahmasbi (@SiamakTadayonT) March 2, 2026

credit – social media and Twitter

तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

रास तनुरा रिफायनरीमधून जगाच्या एकूण तेल गरजेचा मोठा वाटा पुरवला जातो. ही रिफायनरी काही दिवस जरी बंद राहिली, तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ५ ते १० रुपयांची वाढ होऊ शकते. भारतासारख्या देशासाठी, जो मोठ्या प्रमाणात सौदीकडून तेल आयात करतो, ही बातमी अत्यंत चिंतेची आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर आता इराण-सौदी तणावामुळे जागतिक महागाईचा भडका उडण्याची चिन्हे दिसत आहेत.

Saudi Aramco has halted operations at its Ras Tanura refinery in Saudi Arabia after a drone strike in the area https://t.co/zvalC5YJ6e — Bloomberg (@business) March 2, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Khamenei Still Alive: खामेनींचं पार्थिव गायब? 48 तासांनंतरही ना फोटो, ना अंत्यसंस्काराचा पत्ता; इराणच्या मौनामागे गुपित

सौदी अरेबियाची भूमिका आणि आगामी रणनीती

सौदी अरेबियाने अद्याप या हल्ल्यावर अधिकृतपणे कोणतीही आक्रमक भूमिका जाहीर केलेली नाही. “आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत आणि आमच्या तेल मालमत्तांचे रक्षण करण्यास समर्थ आहोत,” असे सौदी अरामकोने एका छोट्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते सौदी अरेबिया शांत बसणार नाही. येत्या २४ तासात सौदी अरेबिया इराणविरुद्ध मोठ्या राजनैतिक किंवा लष्करी कारवाईची घोषणा करण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरामकोच्या कोणत्या रिफायनरीवर हल्ला झाला?

    Ans: सौदी अरेबियातील सर्वात मोठे तेल निर्यात केंद्र असलेल्या 'रास तनुरा' (Ras Tanura) रिफायनरीवर हा हल्ला झाला.

  • Que: या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे?

    Ans: प्राथमिक तपासात आणि जागतिक संरक्षण तज्ञांच्या मते, या ड्रोन हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

  • Que: या हल्ल्याचा भारतावर काय परिणाम होईल?

    Ans: भारत सौदीकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो, रिफायनरी बंद झाल्यामुळे पुरवठा कमी होऊन भारतात इंधन दरवाढ होऊ शकते.

Web Title: Iran drone attack on saudi aramco ras tanura refinery global oil crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • iran
  • Saudi Arabia
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Nuclear Uranium: जागतिक राजकारणात महास्फोट! इराणने अमेरिकेसमोर टेकले गुडघे? ट्रम्प यांच्या ‘युरेनियम’ सोपवण्याच्या वृत्ताने खळबळ
1

Nuclear Uranium: जागतिक राजकारणात महास्फोट! इराणने अमेरिकेसमोर टेकले गुडघे? ट्रम्प यांच्या ‘युरेनियम’ सोपवण्याच्या वृत्ताने खळबळ

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
2

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

युद्धांमुळे अमेरिकेचा शस्त्रास्त्र साठा घटला; आता जनरल मोटर्स आणि फोर्ड शस्त्रास्त्रे बनवणार? पेंटागनचा मोठा विचार
3

युद्धांमुळे अमेरिकेचा शस्त्रास्त्र साठा घटला; आता जनरल मोटर्स आणि फोर्ड शस्त्रास्त्रे बनवणार? पेंटागनचा मोठा विचार

Russia-Ukraine War: 700 ड्रोन, क्षेपणास्त्रांनी रशियाचा महाभयंकर प्रहार; जीवितहानी अन् निष्पापांच्या किंकाळ्यांनी युक्रेन हादरले
4

Russia-Ukraine War: 700 ड्रोन, क्षेपणास्त्रांनी रशियाचा महाभयंकर प्रहार; जीवितहानी अन् निष्पापांच्या किंकाळ्यांनी युक्रेन हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.