इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचे पार्थिव कुठे आहे? त्यांच्या दफनविधीची आणि शवाचेही फोटो नाहीत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Khamenei funeral updates Tehran 2026 : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण जगाला एकाच प्रश्नाने ग्रासले आहे – ‘खामेनींचं पार्थिव नेमकं कुठे आहे?’ २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकन आणि इस्रायली हवाई हल्ल्यात खामेनी मारले गेले, या बातमीला ४८ तासांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्याप इराणच्या सरकारी माध्यमांनी त्यांच्या पार्थिवाचे कोणतेही दर्शन घडवलेले नाही. अंत्यसंस्काराबाबतचा हा सस्पेन्स आता जगभरातील गुप्तचर यंत्रणांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.
‘खलीज टाईम्स’च्या वृत्तानुसार, ज्यावेळी खामेनी यांच्या निवासस्थानावर क्षेपणास्त्र धडकले, तेव्हा ते रिव्होल्यूशनरी गार्डचे प्रमुख मोहम्मद पाकपौर आणि सुरक्षा सल्लागार अली शामखानी यांच्यासोबत गुप्त बैठक घेत होते. हा हल्ला इतका भीषण होता की खामेनी यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, ‘कान मीडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर लगेचच इस्रायलच्या ‘मोसाद’ एजंटांनी त्या भागात प्रवेश मिळवून खामेनींचे पार्थिव ताब्यात घेतले, त्यांची आवश्यक कागदपत्रे तपासली आणि त्याचे फोटो पुराव्यासाठी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना पाठवले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Pakistan War: काश्मीरमध्ये भारत काय करतोय? ज्याला पाकिस्तान म्हणतोय ‘धोकादायक शस्त्र’; शाहबाज शरीफची पाचावर धारण
‘न्यू यॉर्क टाईम्स’ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ढिगाऱ्यातून बाहेर काढलेलं खामेनींचं शरीर अत्यंत विकृत अवस्थेत होतं. या पार्थिवाचा फोटो काढून थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवण्यात आला. ट्रम्प आणि नेतान्याहू हेच अशा व्यक्ती आहेत ज्यांनी खामेनींचा शेवटचा चेहरा पाहिला असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्यानंतर हे पार्थिव इराणच्या ताब्यात दिले गेले की इस्रायलने ते गुप्तस्थळी हलवले, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
#Khamenei is still alive ? If so, is it the beginning of #WorldWar3 ? pic.twitter.com/uQ929xf8Th — Lepchas (@Lepchas_) March 1, 2026
credit – social media and Twitter
इराणमध्ये सध्या खामेनींच्या अंत्यसंस्कारावरून दोन प्रवाह पाहायला मिळत आहेत. १९८९ मध्ये इराणचे पहिले सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांना तेहरानच्या ‘बेहेश्त-ए-जहरा’ स्मशानभूमीत दफन करण्यात आले होते. त्यामुळे खामेनींचे दफनही तेथेच होईल, अशी एक शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे खामेनींचे मूळ गाव ‘मशहद’ येथे त्यांना दफन करण्याची मोठी मागणी होत आहे. मशहद हे शिया समुदायासाठी अत्यंत पवित्र ठिकाण असून, तिथेच त्यांचे जवळचे सहकारी इब्राहिम रईसी यांनाही दफन करण्यात आले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Israel Iran War: हिजबुल्लाहचा ‘राजकीय’ अंत! मोहम्मद राद इस्रायली हवाई हल्ल्यात ठार; IDFने प्रथमच केला ‘Iron beam’ने घातक प्रहार
एक धक्कादायक तर्क असाही लावला जात आहे की, इराण सध्या युद्धजन्य परिस्थितीत आहे. अशा वेळी लाखो लोकांची गर्दी झाल्यास इस्रायल पुन्हा हल्ला करू शकतो, अशी भीती इराणला आहे. हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार पाच महिने लांबणीवर पडले होते. तोच कित्ता इराण खामेनींच्या बाबतीत गिरवण्याची शक्यता आहे. जोपर्यंत परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत खामेनींचे पार्थिव एखाद्या सुरक्षित बंकरमध्ये किंवा वातानुकूलित कक्षात ठेवले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Ans: सुरक्षा कारणास्तव किंवा पार्थिव विकृत झाल्यामुळे इराण सरकारने अद्याप फोटो प्रसिद्ध केले नसावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Ans: न्यू यॉर्क टाईम्सनुसार, इस्रायली मोसाद एजंट आणि त्यानंतर फोटोंच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प व नेतान्याहू यांनी त्यांचे पार्थिव पाहिले.
Ans: तेहरानमधील बेहेश्त-ए-जहरा किंवा त्यांच्या मूळ गावी मशहदमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार होऊ शकतात.






