Iran Israel Conflict Iran executes Mossad agent convicted of spying for Israel
तेहरान: एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणने इस्रायलविरोधी कारवाई केली आहे. इराणच्या न्यायालयाने हेरगिरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पेद्राम मदनीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. हा इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसाद साठी काम करत असल्याचे इराणने म्हटले आहे. पेद्रामने युरोपमध्ये बिटकॉइन आणिु युरोद्वारे पैशांचा गैरव्यवहार केला. हा मोसादच्या प्लॅनचा एक भाग होता, असे इराणने म्हटले आहे.
इराणने आतापर्यंत मोसादच्या अनेक हायफ्रोफाइल लोकांविरोधात कारवाई केली आहे. यामुळे इस्रायलने संताप व्यक्त केला आहे. इस्रायलने ऑपरेशन थंडर बोल्ट सुरु केले आहे. यासाठी अमेरिकेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
अमेरिका इराणच्या अणुकार्यक्रमावर गेल्या काही काळापासून चर्चा करत आहे. परंतु ही चर्चा अद्याप कोणत्याही करारापर्यंत पोहोचलेली नाही. या चर्चांदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू इराणवर हल्ला करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नेतन्याहू हा निर्णय लवकरच घेतली असे म्हटले जात आहे. इस्रायलने हल्ल्याची सर्व तयारी पूर्ण केली असून केवळ नेतन्याहूंच्या आदेशाची सैनिक वाट पाहत आहे. यामुळे इराण आणि इस्रायलमध्ये तणावात दिवसेंदिवस वाढ झाली आहे.
तसेच दुसीरकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे देखील इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईनी संतापले आहे. डोमनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या अणुकरारातील चर्चांदरम्यान इराणच्या अणु प्रकल्पावर अमेरिकेला नियंत्रण देण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी इराणवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. यामुळे हे प्रकण युद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
तसेच दुसीरकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे देखील इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईनी संतापले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या अणुचर्चांदरम्यान इराणवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. यामुळे हे प्रकण युद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, “इराणच्या अणु तळांमध्ये अमेरिकेला कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवेश मिळावा, आम्ही यावर योग्य देखरेख ठेवू शकतो. तसेच अमेरिका इराणच्या अणु तळांना हवे तेव्हा उद्ध्दवस्त करु शकतो.
ट्रम्प यांच्या या विधानानंतर इस्रायलमध्ये आनंदाचे वातावरण आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी अमेरिकेने इराणवर उघडपणे दबाव आणावा अशी मागणी केली होती. यामनुळे ट्रम्प यांच्याकडून पाठिंबा मिळाल्यानंतप नेतन्याहूंनी सध्या इराणवरील हल्ला पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. परंतु यामध्ये अनिश्चितता कायम आहे.
एकीकडे इस्रायलच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता आणि दुसरीकडे ट्रम्प यांचा दबाव यामुळे इराण संतापला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी ट्रम्प यांच्या प्रस्तावाला स्वप्न म्हणून संबोधले आहे. अली खामेनेई यांनी म्हटले की, इराणच्या अणु तळांवर नियंत्रण मिळवण्याचे अमेरिका केवळ स्वप्न पाहू शकते. इराण हा एक स्वतंत्र आणि शक्तीशावी देश आहे.