Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

Iran Navy : इराणचे नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात येत असताना इराणचे नौदलप्रमुख शाहराम इराणी यांनी हे दावे फेटाळले आहेत. इराणी यांच्या म्हणण्यानुसार, इराणचे नौदल अजूनही पूर्णपणे कार्यरत असून विविध समुद्री भागांमध्ये आपल्या मोहिमा सुरू ठेवत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 30, 2026 | 08:14 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा दावा; इराणच्या नौदलाला मोठे नुकसान
  • नौदलाची क्षमता संपलेली नाही
  • होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संघर्षाचा केंद्रबिंदू
Iran Navy : अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या नौदलाच्या क्षमतेवरून पुन्हा एकदा दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नौदलाला मोठे नुकसान झाल्याचे आणि अनेक युद्धनौका नष्ट केल्याचे म्हटले आहे. मात्र, इराणचे नौदलप्रमुख रिअर अॅडमिरल शाहराम इराणी यांनी हे दावे फेटाळून लावत आपले नौदल “पूर्णपणे कार्यरत आणि सक्षम” असल्याचे स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांचा दावा; इराणच्या नौदलाला मोठे नुकसान

अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी कारवायांमध्ये इराणच्या नौदलाला मोठा फटका बसल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी इराणच्या नौदलाची अनेक जहाजे नष्ट झाल्याचे सांगत उर्वरित नौदलावरही कारवाई सुरू असल्याचे म्हटले होते.

अमेरिकेच्या दाव्यानुसार इराणच्या प्रमुख नौदल तळांवर आणि युद्धनौकांवर हल्ले करण्यात आले. त्यामुळे इराणची समुद्री लढाऊ क्षमता मोठ्या प्रमाणात कमकुवत झाल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.

Sydney Marathon : इस्रायली सैनिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश कसा मिळाला? सरकारवर स्पष्टीकरण देण्याचा दबाव

नौदलाची क्षमता संपलेली नाही

इराणचे नौदलप्रमुख शाहराम इराणी यांनी अमेरिकेच्या दाव्यांना थेट प्रत्युत्तर दिले आहे. इराणी यांच्या म्हणण्यानुसार, इराणच्या नौदलाची क्षमता नष्ट झालेली नसून इराणी नौदलाची जहाजे अजूनही विविध समुद्री भागांमध्ये कार्यरत आहेत.

इराणी यांनी असा सवालही उपस्थित केला की, जर इराणचे नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असेल, तर विरोधी देशांना इराणच्या समुद्री क्षेत्रात पुढे जाण्याचे धाडस का होत नाही? त्यांच्या मते, नौदलाची खरी क्षमता केवळ माध्यमांमधील दाव्यांवरून नव्हे, तर प्रत्यक्ष कार्यरत उपस्थितीवरून ठरवली पाहिजे.

North Cyprus Ferry Accident : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ 267 जणांना घेऊन जाणारी फेरी उलटली; बचावकार्य सुरू

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संघर्षाचा केंद्रबिंदू

इराणच्या नौदलाच्या क्षमतेचा प्रश्न हॉर्मुझच्या सामुद्रधुनीशी जोडला जात आहे. जगातील महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी ही एक सामुद्रधुनी असल्याने तिच्यावर इराणचा प्रभाव हा अमेरिका आणि इराणमधील संघर्षातील महत्त्वाचा मुद्दा आहे.

इराणने अलीकडेच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे अमेरिका या मार्गातून आंतरराष्ट्रीय जहाजांची वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

त्यामुळे ट्रम्प यांच्या दाव्यांनंतर इराणी नौदलप्रमुखांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. इराणचे नौदल प्रत्यक्षात किती सक्षम राहिले आहे, याबाबत दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी चित्र मांडले जात आहे.

Web Title: Iran navy our navy is fully operational iranian navy chiefs retort to trumps claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US Iran war

संबंधित बातम्या

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
1

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Trump Media Ban: ट्रम्प प्रशासनाचा सूडबुद्धीचा निर्णय फेडरल कोर्टाने उधळला; CNN, MSNBCच्या पत्रकारांचा मोठा विजय
2

Trump Media Ban: ट्रम्प प्रशासनाचा सूडबुद्धीचा निर्णय फेडरल कोर्टाने उधळला; CNN, MSNBCच्या पत्रकारांचा मोठा विजय

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’
3

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?
4

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.