Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Regime : मोजतबा खामेनेईंचा पत्ता गुलदस्त्यातच! सर्वोच्च नेत्याला पडद्याआड ठेवून सत्तांतर रोखण्याची इराणची खेळी?

Iran Power Shift : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई गेल्या ६ आठवड्यांपासून गायब आहेत. यामुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. ट्रम्प यांचा इराणमध्ये सत्तापालटाचा डाव यशस्वी झाला, असे म्हटले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 22, 2026 | 11:43 AM
Mojtaba Khamenei

Mojtaba Khamenei

Follow Us
Follow Us:
  • इराणचे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई कुठे गायब आहे
  • ६ आठवड्यांपासून वाढतंय गूढ
  • इराण नेमकं कोणती खेळी खेळतंय?
Mojtaba Khamenei : तेहरान : अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणमध्ये लष्करी कारवाई सुरु केली होती. या लष्करी कारवाईने संपूर्ण जग हादरले होते. या हल्ल्यात इराणचे माजी सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई (Ali Ayatollah Khamenei) यांचा मृत्यू झाला. यामुळे इराणला मोठा धक्का बसला होता. यानंतर खामेनेईंचे सुपुत्र मोजतबा यांची इराणचे नवे सुप्रीम लीडर म्हणून नियुक्त करण्यात आली होती. मात्र नियुक्ती होऊन दीड महिन्या उलटून गेला आहे, पण खामेनेई सार्वजनिकरित्या कोठेही दिसले नाहीत. यामुळे इराणची सत्ता नेमकी कोणाच्या हाती आहे, पडद्यामागे काय खेळ सुरु आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

US Iran Conflict : ‘इराण धमक्यांपुढे झुकणार नाही’; गालिबाफ यांचा शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांना मोठा इशारा

बंकरमध्ये लपले की गंभीर जखमी?

मध्यपूर्वेतील माध्यमांनी केलेल्या दाव्यांनुसार, अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे. यामुळे ते एका गुप्त ठिकाणी उपचार घेत असून कोमात असल्याचाही दावा केला जात आहे. परंतु इराणच्या  सरकारी माध्यमांनी हे सर्व दावे फेटाळून लावले असून खामेनेई सुरक्षेच्या कारणास्तव समोर आले नसल्याचे सांगितले जात आहे.

सत्तेची सुत्रे नेमकी कोणाच्या हाती

मोजतबा खामेनेई यांच्या अनुउपस्थितीत इराणमधील इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि काही कट्टरपंथी पडद्यामागून निर्णय घेत असल्याचे म्हटले जात आहे. यामागचे कारण म्हणजे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी होर्मुझ (Hormuz) खुला करण्याची घोषणा केली होती, परंतु IRGC ने लगेचचे ती बंद असल्याचे जाहीर केले. या विरोधाभासामुळे इराणच्या सत्तेची सुत्रे IRGC कडे असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय गेल्या काही काळात मोजतबा खामेनेई यांनी केवळ लेखी किंवा ऑडिओ क्लिप द्वारे संदेश जारी केले आहेत. यामुळे हे गूढ अधिकच वाढत आहे.

ट्रम्प यांची सत्तापालटाची रणनीती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणमध्ये सत्तापालट झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, ते नव्या लोकांशी चर्चा करत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये शांतता चर्चेत इराणचे प्रतिनिधी कोणच्या आदेशावरुन वाटाघाटी करत आहेत हेही अस्पष्ट आहे. विशेष करुन भीषण युद्धाच्या काळात अमेरिकेने इराणचे अस्तित्व मिटवून टाकण्याची धमकी दिलेली असतानाही मोजतबा समोर आलेले नाहीत. यामुळे इराणमध्ये सत्तांतर झाल्याच्या चर्चांणा अधिकच उधाण आले आहे.

तज्ज्ञांच्या मते इराण सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. मोजतबा लवकरच जनतेसमोर न आल्यास इराणमध्ये अंतर्गत युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे इराणचे लष्कर किती दिवस मोजतबा यांना सुरक्षा कवच म्हणून वापरणार, ही रणनीती इराणला धोक्यात टाकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

US Iran Ceasefire : ‘…तरच चर्चा होईल’; ट्रम्प यांचा युद्धबंदीचा प्रस्ताव इराणने पायदळी तुडवला, मध्यपूर्व पुन्हा पेटणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण आहेत मोजतबा खामेनेई?

    Ans: मोजतबा खामेनेई हे इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे दुसरे सुपुत्र आहेत. खामेनेईंच्या मृत्यूनंतर त्यांची नवे सुप्रीम लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • Que: मोजतबा खामेनेई गेल्या ६ आठवड्यांपासून बेपत्ता का आहेत?

    Ans: आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, ज्या हल्ल्यात अली खामेनेईचा मृत्यू झाला, त्याच हल्ल्यात मोजतबा खामेनेई जखमी झाले असून त्यांच्यावर गुप्त ठिकाणी उपचार सुरु आहेत किंवा ते कोमात आहेत. परंतु इराणच्या राजकीय तज्ज्ञांच्या मेत, ते सुरक्षित असून त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव भूमिगत बंकरमध्ये ठेवण्यात आले आहे. तिथूनच ते देशाचा कारभार पाहत आहे.

  • Que: इराणमध्ये सध्या सत्ता परिवर्तनाची काय चिन्हे आहेत?

    Ans: इराणमध्ये सध्या राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्तापालट झाल्याचा दावा केला आहे. शिवाय तेथील सरकारी आणि लष्करी अधिकऱ्यांच्या विरोधी आदेशांवरुन सत्तांतर झाल्याचे स्पष्ट होत आहे. मोजतबा खामेनेई देखील अद्याप समोर आलेले नाहीत यामुळे इराणच्या खऱ्या सत्ताप्रमुखावरुन संभ्रम आहेच.

Web Title: Iran regime mojtaba khamenei missing mystery political crisis irgc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Mojtaba Khamenei
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य
1

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील
2

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा
3

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल
4

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.