Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : आखाती देशांत शांततेचे वारे! इराणचा पाकिस्तानमार्फत अमेरिकेला ‘गुप्त’ प्रस्ताव; वाचा अटी आणि शर्तींचा पेच काय?

US-Iran War: इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेला एक शांतता प्रस्ताव पाठवला असून, त्यात होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा आणि युद्धविरामाचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, तेहरानला अणुविषयावरील चर्चा सध्या स्थगित करायची आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 27, 2026 | 10:28 AM
iran sends peace proposal to us via pakistan strait of hormuz reopening 2026

iran sends peace proposal to us via pakistan strait of hormuz reopening 2026

Follow Us
Follow Us:
  • शांततेचा हात
  • अणुकार्यक्रमाचा पेच
  • ट्रम्प यांचा निर्णय निर्णायक

Iran US peace proposal April 2026 : जागतिक राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि इराणमधील तणाव (US-Israel Iran War)  शिगेला पोहोचलेला असतानाच इराणकडून एक महत्त्वपूर्ण राजनैतिक पाऊल उचलण्यात आले आहे. रस्ते आणि सागरी मार्ग रोखून धरणाऱ्या इराणने आता होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा आणि सुरू असलेला सशस्त्र संघर्ष थांबवण्याचा प्रस्ताव अमेरिकेसमोर ठेवला आहे. या प्रस्तावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून युद्धाच्या छायेखाली वावरणाऱ्या जगाला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाकिस्तान ठरला ‘मध्यस्थ’

एका बाजूला अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंधांचा पाऊस पाडला असताना, इराणने थेट संवाद न साधता पाकिस्तानमार्फत आपला प्रस्ताव वॉशिंग्टनला पाठवला आहे. ‘ॲक्सिऑस’च्या अहवालानुसार, या करारामध्ये सागरी मार्गांचे सामान्यीकरण आणि तात्काळ युद्धविराम यावर प्राथमिक सहमती देण्याची तयारी इराणने दर्शवली आहे. पाकिस्तानने या प्रकरणातील ‘दूत’ म्हणून बजावलेली भूमिका प्रादेशिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, इराणच्या अंतर्गत वर्तुळात अणुकार्यक्रमावर किती सवलती द्यायच्या, यावरून अजूनही मतभेद असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WHCD Shooting : ‘मी रेपिस्ट नाही’ लाइव्ह टीव्हीवर भडकले डोनाल्ड ट्रम्प; हल्लेखोराच्या पत्रातील घाणेरड्या आरोपांना दिलं उत्तर

अणुकार्यक्रमाचा पेच आणि ट्रम्प यांची रणनीती

इराणच्या प्रस्तावातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे अणुविषयक चर्चा. इराणला सध्याची युद्धसदृश परिस्थिती संपवायची असली, तरी त्यांच्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षेवर कोणतीही तडजोड करण्यास ते सध्या तयार नाहीत. त्यांनी हा विषय नंतरच्या टप्प्यासाठी पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. तज्ज्ञांच्या मते, हा इराणचा एक ‘मास्टर प्लॅन’ असू शकतो. जर होर्मुझ उघडली गेली आणि युद्ध थांबले, तर ट्रम्प यांच्यासाठी इराणवर अणु करारासाठी दबाव टाकण्याचे पर्याय मर्यादित होतील.

BREAKING: Iran has offered Washington a deal through Pakistani mediators to reopen the Strait of Hormuz and end the war while postponing all talks on its nuclear program to a later stage. Axios reported the proposal late yesterday. Trump’s national security team is reviewing it… pic.twitter.com/5OmwGP1yXI — Shanaka Anslem Perera ⚡ (@shanaka86) April 27, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Japan Earthquake: जपानवर निसर्गाची वक्रदृष्टी! 8 दिवसांत दुसऱ्यांदा जमीन हादरली; 6.1 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीच्या धास्तीने पळापळ

सिच्युएशन रूममध्ये खलबतं

मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव गांभीर्याने घेतला असून, व्हाईट हाऊसच्या ‘सिच्युएशन रूम’मध्ये यावर चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीच इराणला थेट फोनवर बोलण्याचे आवाहन केले होते. “जर इराणला चर्चा करायची असेल, तर आमचे दरवाजे उघडे आहेत,” असे संकेत त्यांनी दिले होते. त्यामुळे आता अमेरिका हा अटींसह आलेला प्रस्ताव स्वीकारणार की इराणवर आणखी दबाव वाढवणार, याकडे सर्वच जागतिक सत्तांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने पाकिस्तानमार्फत कोणता प्रस्ताव दिला आहे?

    Ans: इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणे आणि युद्धविराम करणे या अटींवर शांतता चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

  • Que: या प्रस्तावात अडचण काय आहे?

    Ans: इराणला त्यांचा अणुकार्यक्रम (Nuclear Program) सध्या चर्चेपासून दूर ठेवायचा आहे, जे अमेरिकेसाठी मान्य करणे कठीण असू शकते.

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका काय आहे?

    Ans: ट्रम्प यांनी या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली असून ते थेट संवादाच्या बाजूने आहेत.

Web Title: Iran sends peace proposal to us via pakistan strait of hormuz reopening 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
1

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
2

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा
3

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा

Canada Plane Crash : पायलट बनण्याचे स्वप्न अपूर्णच! कॅनडामध्ये उड्डाण प्रशिक्षणादरम्यान 2 भारतीय वैमानिकांचा दुर्दैवी अंत
4

Canada Plane Crash : पायलट बनण्याचे स्वप्न अपूर्णच! कॅनडामध्ये उड्डाण प्रशिक्षणादरम्यान 2 भारतीय वैमानिकांचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.