
Trump on Iran leadership
ट्रम्प यांनी एका मुलाखतीत इराणमध्ये ३७ वर्षाच्या खामेनेई राजवटीचा अंत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी इराणमध्ये नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दावा केला आहे की, खामेनींच्या नेतृत्वात इराणमध्ये जगातील सर्वात वाईट अर्थव्यवस्था बनला आहे. त्यांनी खामेनेईंवर हिंसाचाराचा आणि दडपशाहीचा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी हे विधान इराणमधील हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे.
इराणमध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून तीव्र निदर्शने झाले होते. इस्लामिक लोकशाहीविरोधात ही निदर्शने सुरु होते. यावेळी निदर्शनांना दाबण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला होता. यामध्ये सुरक्षा दलांच्या गोळीबारात २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते. सध्या ही निदर्शने काही प्रमाणात आटोक्यात आली आहेत. इराणने ८०० लोकांच्या फाशीचा निर्णय रद्द केल्यानंतर परिस्थिती पुन्हा शांत होताना दिसत आहे. तसेच निदर्शनांदरम्यान अमेरिकेच्या हल्ल्याची भिती निर्माण झाली होती.
सध्या अमेरिकेने देखील इराणवरील हल्ल्याचा निर्णय मागे घेतला आहे. परंतु ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे दोन्ही देशात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. ट्रम्प यांनी हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणचे नेतृत्व हे दडपशाही आणि हिंसाचारावर आधोरित असल्याचे म्हटले आहे. त्यांनी खामेनेईंवर देश नष्ट केल्याचा आणि लोकांना मारल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.
दरम्यान याच वेळी खामेनेई यांनी देखील ट्रम्प यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रीय दिली आहे. खामेनेईंनी निदर्शनात बळी गेलेल्या लोकांच्या मृत्यूसाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. तसेच त्यांनी निदर्शकांना देशद्रोही ठरवले आहे. खामेनेईंनी अमेरिकेमुळे इराणमध्ये अराजकता पसरली असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना सोडणार नाही असा इशारा दिला आहे. यावरुन ट्रम्प यांनी गुन्हेगार म्हणून संबोधले असल्याचे स्पष्ट होते.
Ans: ट्रम्प यांनी इराणमध्ये नव्या नेतृत्त्वाची, सत्ता बदलाची गरज असल्याचे म्हटले आहे. खामेनेई यांच्या नेतृत्वावर हिंसेचे आणि दडपशाहीचे आरोप केले आहेत.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर प्रत्युत्तर देत खामेनेईंनी ट्रम्प यांना निदर्शनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या हत्येसाठी जबाबदार धरले आहे.
Ans: इराणमध्ये देशांतर्गत आर्थिक संकट, महागाई आणि बेरजोगारीविरोधात आंदोलन सुरु होते. परंतु या निदर्शनाला दाबण्यासाठी बळाचा वापर केला जे पुढे जाऊन सरकारच्या धार्मिक कठोर निर्बंधाविरोधात आणि दडपशाहीविरोधात रुपांतरित झाले.