Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Vs Iran War: इराणचे राष्ट्राध्यक्ष संतापले! खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार; ‘या’ मोठ्या घोषणेमुळे जागतिक विश्वात खळबळ

Middle East Tension Rises: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी खामेनेईंच्या मृत्यूवर भाष्य करताना या घटनेला 'मुसलमानांविरुद्ध पुकारलेले उघड युद्ध' असे संबोधले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 01, 2026 | 04:27 PM
इराणचे राष्ट्राध्यक्ष संतापले! खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार (Photo Credit- X)

इराणचे राष्ट्राध्यक्ष संतापले! खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • इराणचे राष्ट्राध्यक्ष संतापले!
  • खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार
  • ‘या’ मोठ्या घोषणेमुळे जागतिक विश्वात खळबळ
Israel Vs Iran War News: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी खामेनेईंच्या मृत्यूवर भाष्य करताना या घटनेला ‘मुसलमानांविरुद्ध पुकारलेले उघड युद्ध’ असे संबोधले आहे. खामेनेईंची हत्या हा अमेरिका आणि इस्रायलचा संयुक्त कट असून, याचा बदला घेतल्याशिवाय इराण स्वस्थ बसणार नाही, अशी गर्जना पेझेश्कियान यांनी केली आहे.

‘शिया समुदायावरील सर्वात मोठा हल्ला’

इराणी सरकारी टीव्हीवरून देशाला संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान म्हणाले की, “खामेनेईंची हत्या ही केवळ एका व्यक्तीची हत्या नसून, ती जगभरातील शिया समुदायाच्या नेतृत्वावर केलेला आघात आहे. ही घटना संपूर्ण मुस्लिम जगाच्या, विशेषतः शिया समुदायाच्या विरोधात युद्ध सुरू झाल्याचे संकेत आहे.” खामेनेईंच्या निधनामुळे इराणमध्ये सध्या ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.

Iranian President Masoud Pezeshkian has declared that any attempt to kill Supreme Leader Ayatollah Khamenei would be “an open war against Muslims, especially Shiites, worldwide.” In a statement shared on Iran’s official Telegram channel, he warned that Iran “plans to shed blood… pic.twitter.com/m1RYHonTqt — AfroVera News (@AfroveraMediaCo) March 1, 2026

Iran Israel युद्ध आणखी पेटलं! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ओमानच्या जहाजावर हल्ला; भारतीय भरडले

‘प्रतिशोध हा आमचा अधिकार’; संघर्षाची धार तीव्र

या ऐतिहासिक गुन्ह्याचा कट रचणाऱ्यांचा बदला घेणे हे इराणचे कायदेशीर कर्तव्य आणि अधिकार असल्याचे पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले. “आम्ही हा गुन्हा विनाउत्तर सोडणार नाही. इराण आपल्या पूर्ण शक्तीनिशी आणि जगातील स्वतंत्र लोकांच्या पाठिंब्याने गुन्हेगारांना पश्चात्ताप करण्यास भाग पाडेल,” असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, इराणने अमेरिकन लष्करी तळ आणि इस्रायलवर प्रतिहल्ले सुरू केल्याचे वृत्त असून यामुळे प्रादेशिक युद्धाचा धोका वाढला आहे.

इराणसमोर नेतृत्वाचे मोठे संकट

खामेनेई १९८९ पासून इराणचे सर्वोच्च नेते म्हणून कार्यरत होते. गेल्या चार दशकांपासून त्यांनी देशाचे राजकारण, लष्कर आणि धार्मिक धोरणांना दिशा दिली. त्यांच्या निधनामुळे इराणमध्ये सत्ता संक्रमणाचे मोठे संकट उभे राहिले आहे. सध्या राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान आणि वरिष्ठ अधिकारी तात्पुरत्या स्वरूपात देशाचे नेतृत्व सांभाळत आहेत. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनेईंच्या मृत्यूची पुष्टी करत, “इराणी जनतेसाठी आपला देश पुन्हा ताब्यात घेण्याची ही सर्वात मोठी संधी आहे,” असे विधान केले आहे.

जनता रस्त्यावर; अमेरिका-इस्रायल विरोधी निदर्शने

इराण सरकारने खामेनेईंना ‘शहीद’ घोषित केले असून, या घटनेनंतर तेहरानसह इराणमधील प्रमुख शहरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हजारो लोक रस्त्यावर उतरले असून अमेरिका आणि इस्रायलविरोधी घोषणाबाजी केली जात आहे. राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी जनतेला एकजूट राहण्याचे आणि इस्लामिक प्रजासत्ताकाचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. ही परिस्थिती एका मोठ्या युद्धाची नांदी ठरण्याची भीती संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात इराणची नेमकी भूमिका काय असेल आणि अमेरिका-इस्रायल आघाडी याला कसे प्रत्युत्तर देईल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Iran-Israel War: महायुद्ध संपले नाही! इराणच्या मशिदीवर ‘लाल झेंडा’, रक्ताचा बदला घेण्याची गर्जना; ट्रम्पनेही दिली ‘भयंकर’ धमकी

Web Title: Iranian president furious will avenge khameneis death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • iran
  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Iran War : इस्रायलवर कतार संतापला; ‘युद्धाचा फायदा घेत संपूर्ण प्रदेशात प्राणघातक हल्ले’
1

Iran War : इस्रायलवर कतार संतापला; ‘युद्धाचा फायदा घेत संपूर्ण प्रदेशात प्राणघातक हल्ले’

SCO Summit : बिश्केकमध्ये महासत्तांचे मंथन; युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष आज पंतप्रधान मोदींना भेटणार, खळबळ तीव्र
2

SCO Summit : बिश्केकमध्ये महासत्तांचे मंथन; युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष आज पंतप्रधान मोदींना भेटणार, खळबळ तीव्र

US-Iran war: लारक बेटावरील हल्ल्याचा इराणने घेतला सूड; जॉर्डनमधील अमेरिकेच्या एअरबेसवर केला बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव
3

US-Iran war: लारक बेटावरील हल्ल्याचा इराणने घेतला सूड; जॉर्डनमधील अमेरिकेच्या एअरबेसवर केला बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव

Mecca Pact Danger: ‘मक्का करारात’ इराण अन् बांगलादेशचा प्रवेश? भारताच्या सुरक्षेला महाधोका; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
4

Mecca Pact Danger: ‘मक्का करारात’ इराण अन् बांगलादेशचा प्रवेश? भारताच्या सुरक्षेला महाधोका; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.