Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Victory : इराणसोबतचा Ceasefire हा अमेरिकेचा पराभव; Trump यांनी का पत्करली शरणागती, हे ‘या’ 5 मुद्द्यांमध्ये घ्या समजून

इराण युद्ध सुरू झाल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अमेरिकेच्या अटींवर शरणागती पत्करण्याचे आवाहन केले होते, परंतु आता वॉशिंग्टनने स्वतःच तेहरानच्या अटी मान्य केल्या आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 08, 2026 | 04:25 PM
is us iran ceasefire a defeat for america trump surrender reasons 2026

is us iran ceasefire a defeat for america trump surrender reasons 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेचा सपशेल यू-टर्न
  • होर्मुझवर इराणचे वर्चस्व
  • मित्र राष्ट्रांना धक्का

Donald Trump surrenders to Iran conditions : आंतरराष्ट्रीय राजकारणात गेल्या ४० दिवसांपासून सुरू असलेला इराण-अमेरिका संघर्ष (US-Israel Iran War) आता एका अत्यंत अनपेक्षित वळणावर येऊन थांबला आहे. ज्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणची संस्कृती नष्ट करण्याची भाषा केली होती, त्यांनीच आता इराणच्या अटींवर युद्धविराम मान्य केला आहे. जवळपास ४० अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च करूनही अमेरिकेच्या हाती काहीही लागले नसल्याने, अमेरिकेतील राजकीय वर्तुळातून ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. हा केवळ युद्धविराम नसून इराणचा नैतिक आणि सामरिक विजय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काय आहे ‘सीझफायर’मागचं खरं सत्य?

युद्धाच्या सुरुवातीला अमेरिकेची अट होती की इराणने आपले सर्व संवर्धित युरेनियम अमेरिकेच्या हवाली करावे. मात्र, आता झालेल्या तात्पुरत्या करारानुसार, इराणने या अटीला केराची टोपली दाखवली आहे. उलट, अमेरिकेने इराणचा असा प्रस्ताव स्वीकारला आहे ज्यामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी इराण आता प्रत्येक जहाजाकडून ‘टोल’ वसूल करणार आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हा मार्ग विनामूल्य होता, पण आता तिथे इराणची सत्ता अधिकृतपणे मान्य केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Aatmanirbhar Bharat: शत्रूचा नायनाट करण्यासाठी ‘ड्रोन आर्मी’ आणि ‘अणु-पाणबुड्या’ सज्ज; ‘अशी’ आखली जातेय भारताची नवी संरक्षण रणनीती

अमेरिकेच्या या निर्णयाची ५ प्रमुख कारणे:

१. होर्मुझवरील इराणचे नियंत्रण: अमेरिका इराणला होर्मुझची सामुद्रधुनी बळजबरीने उघडायला लावण्यात अपयशी ठरली. इराणने भारतासह मित्र देशांच्या जहाजांना परवानगी दिली असली, तरी आता तिथून जाणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक जहाजावर इराणचा कर असेल. यामुळे इराणच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे.

२. वाढता युद्धखर्च आणि अंतर्गत दबाव: ‘आयएनएसएस’चे वरिष्ठ फेलो डेनिस सिट्रिनोविच यांच्या मते, अमेरिकेसाठी हे युद्ध आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. दररोज कोट्यवधी डॉलर्स खर्च होत असल्याने ट्रम्प प्रशासनाला यातून बाहेर पडण्याची घाई होती. त्यामुळेच मित्र राष्ट्रांना विश्वासात न घेता घाईघाईने हा करार करण्यात आला.

३. इराणमधील मजबूत राजवट: ट्रम्प यांनी सुरुवातीला असा अंदाज वर्तवला होता की युद्धामुळे इराणमध्ये लष्करी उठाव होईल आणि तिथली राजवट कोसळेल. मात्र, ४० दिवसांनंतरही इस्लामिक प्रजासत्ताकाची पकड ढिली झाली नाही. उलट, ट्रम्प यांना करार करण्यासाठी मोजतबा खामेनी यांच्याशी संपर्क साधावा लागला, जे इराणचे वाढलेले महत्त्व अधोरेखित करते.

President Trump said the US has received a “workable” 10 point proposal from Iran, that a “two week period will allow the Agreement to be finalised and consummated”. Here’s what we know ⤵️ 🔴 LIVE updates: https://t.co/9YvbvxfUvc pic.twitter.com/RSYh4XZafK — Al Jazeera English (@AJEnglish) April 8, 2026

credit – social media and Twitter

४. युद्धाची भीती संपली: इराणने गेल्या ३९ दिवसांत अमेरिकेचे सर्वात भयानक हल्ले सहन केले आहेत. यामुळे इराणच्या मनात आता अमेरिकन लष्करी ताकदीची भीती राहिलेली नाही. डेनिस सिट्रिनोविच म्हणतात की, “इराणने सर्वात वाईट परिस्थिती पाहिली आहे, त्यामुळे भविष्यात अमेरिका आता युद्धाची धमकी देऊन इराणला झुकवू शकणार नाही.”

५. ट्रम्प यांचे वैयक्तिक विधान आणि संभ्रम: ट्रम्प यांनी मोजतबा खामेनी यांना ‘कमी कट्टरतावादी’ संबोधून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इराणची परिस्थिती ‘उत्कृष्ट’ असल्याचे म्हटले. मात्र, अमेरिकन सिनेटर ख्रिस मर्फी यांच्या मते, ही स्पष्टपणे शरणागती आहे, कारण इराण जेव्हा कमकुवत होता तेव्हाच ट्रम्प यांनी त्यांचे सर्व प्रस्ताव मान्य केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Crisis: इराण संकटात पाकिस्तानची स्क्रिप्ट व्हाईट हाऊसने लिहिली? शहबाज शरीफ यांची ती ‘पोस्ट’ धक्कादायक अन् पुरावे VIRAL

इस्रायलची तीव्र प्रतिक्रिया

इस्रायलचे माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी या करारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “हा करार म्हणजे इस्रायलच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे असून हा एक आत्मघातकी हल्ला आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेने आपल्या अटींवर युद्ध थांबवण्याऐवजी इराणला हवं तसं वागू दिल्याने मध्य-पूर्वेतील इस्रायलचे स्थान धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराण-अमेरिका युद्धविराम (Ceasefire) करारात काय ठरले आहे?

    Ans: करारानुसार इराण होर्मुझची सामुद्रधुनी सशर्त उघडणार असून तिथून जाणाऱ्या जहाजांकडून 'टोल' आकारणार आहे, तर अमेरिका सध्या हल्ले थांबवणार आहे.

  • Que: तज्ज्ञ याला अमेरिकेचा पराभव का मानत आहेत?

    Ans: कारण अमेरिकेने इराणचे युरेनियम संवर्धन थांबवण्याची मूळ अट सोडून दिली असून इराणच्या बहुतेक अटी मान्य केल्या आहेत.

  • Que: होर्मुझच्या सामुद्रधुनीतील बदलाचा काय परिणाम होईल?

    Ans: आतापर्यंत मोफत असणाऱ्या या मार्गावर आता इराणचा कर (Toll) असेल, ज्यामुळे जागतिक मालवाहतुकीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Is us iran ceasefire a defeat for america trump surrender reasons 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

VIRAL : Donald Trump सारख्या दिसणाऱ्या म्हशीवरुन इराणचा खोचक टोला; सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत
1

VIRAL : Donald Trump सारख्या दिसणाऱ्या म्हशीवरुन इराणचा खोचक टोला; सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित
2

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित

अमेरिकेने इशारा समजावा की दुसरं काय…रशियाकडून तेल घेतच राहणार भारत, परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांचं थेट विधान
3

अमेरिकेने इशारा समजावा की दुसरं काय…रशियाकडून तेल घेतच राहणार भारत, परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांचं थेट विधान

Iran Peace Deal: अमेरिका आणि इराण ६० दिवसांच्या सीझफायरवर सहमत; होर्मुझची सामुद्रधुनी होणार सर्वांसाठी खुली
4

Iran Peace Deal: अमेरिका आणि इराण ६० दिवसांच्या सीझफायरवर सहमत; होर्मुझची सामुद्रधुनी होणार सर्वांसाठी खुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.