Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित

Donald Trump on PM Modi : दिल्लीतील एका कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट व्हिडिओ कॉल केला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करत त्यांचा मोठा फॅन असल्याचे म्हटले. तसेच अमेरिका भारताच्या पाठीशी आहे अशी ग्वाही देखील दिली.

  • By स्वराली शहा
Updated On: May 25, 2026 | 09:50 AM
Trump Call Rubio in Delhi

Trump Call Rubio in Delhi

Follow Us
Follow Us:
  • रुबियो यांच्या दिल्लीतील बैठकीत ट्रम्प यांचा थेट व्हिडिओ कॉल
  • पंतप्रधान मोदींचे कौतुक करत मोठा फॅन असल्याचा दावा
  • अमेरिका भारताच्या पाठीशी असल्याची दिली ग्वाही
Donald Trump on PM Modi : नवी दिल्ली : नवी दिल्लीत नुकत्याच एका पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान एक अत्यंत रंजक प्रसंग पाहायला मिळाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी थेट वॉशिंग्टनमधून व्हिडिओ कॉलद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरुन कौतुक केले. त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर जाहीपणे व्यक्त करत, स्वत:ला पंतप्रधान मोदींचा फॅन घोषित केले.

Rubio-Modi Meet : मार्को रुबियो यांच्याकडून PM मोदींनी व्हाईट हाऊस भेटीचे आमंत्रण; नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

सध्या अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारताच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. दरम्यान रविवारी (२४ मे) त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. तसेच त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांचीही भेट घेतली. यावेळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर देखील उपस्थित होते.

ट्रम्प यांचा थेट व्हिडिओ कॉल

या कार्यक्रमात अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी ट्रम्प यांचा व्हिडिओ कॉल उपस्थितांना ऐकवला. ट्रम्प यांनी दिल्लीत उपस्थित असलेल्या सर्वांना संबोधित केले. तसेच भारत आणि अमेरिका(America) मजबूत संबंधावर शिक्का मोर्तब केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एक उत्तम नेते आहे आणि माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. आय लव प्राइम मिनिस्टर मोदी! – अशा शब्दात कौतुक केले.

भारत अमेरिका संबंध

ते पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिकेचे संबंध आतापर्यंत कधीच एवढे चांगले नव्हते. पण आता चित्र बदलले आहे. कोणत्याही परिस्थिती भारत अमेरिकेवर १००% विश्वास ठेवू शकतो असे त्यांनी म्हटले. भारताला कधीही, कोणतीही मदत लागली तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.

ट्रम्प यांनी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यावर विश्वास व्यक्त केला. रुबियो हे अमेरिकेचे उत्तम प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास दाखवला. तसेच पंतप्रधान मोदींना माझा आदरपूर्वक नमस्कार सांगा आणि त्यांचा किती मोठा फॅन आहे, हे नक्की कळवा असाही संदेश त्यांनी दिला.

#WATCH | Delhi | US President Donald Trump says, “…India can count on me 100%. If they ever need help, they know where to call. They call right here. We’re doing well. We’re setting records. We have a record economy, a record stock market and anything India wants to get. I am a… pic.twitter.com/EhbgguUiTm — ANI (@ANI) May 24, 2026


Rubio India Visit : भारताला इंधन पुरवठा करणार अमेरिका? परराष्ट्र मंत्री रुबियो यांच्या दौऱ्यात होणार मोठा करार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी दिल्लीती कार्यक्रमात काय संदेश दिला?

    Ans: ट्रम्प यांनी दिल्लीतील कार्यक्रमात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि राजदूत सर्जियो गोर यांना थेट व्हिडिओ कॉल केला. यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मी PM मोदींचा मोठा फॅन आहे, ते माझे चांगले मित्र आहेत. भारत-अमेरिका संबंध कधीही एवढे मजबूत नव्हते असे त्यांनी म्हटले.

  • Que: ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधावर काय वक्तव्य केले?

    Ans: दिल्लीतील व्हिडिओकॉलदरम्यान ट्रम्प यांनी भारताला पूर्ण सुरक्षा आणि सहकार्याची ग्वाही दिली. भारत कोणत्याही संकटात अमेरिकेवर आणि माझ्यावर १००% विश्वास ठेवू शकतो असे त्यांनी म्हटले,

Web Title: Donald trump praises pm modi video call rubio delhi meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत
1

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून
2

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व
3

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य
4

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.