Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्लामाबादमध्ये ‘रेड अलर्ट’! मुसळधार पावसाने पाकिस्तानमध्ये हाहाकार; 883 जणांचा मृत्यू, शेकडो गावे पाण्याखाली

Pakistan floods News: जून महिन्याच्या अखेरीपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत 883 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 04, 2025 | 03:00 PM
islamabad red alert pakistan rains update 883 people affected villages submerged

islamabad red alert pakistan rains update 883 people affected villages submerged

Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तान सध्या भीषण नैसर्गिक आपत्तीशी झुंजतो आहे. जून महिन्याच्या अखेरीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण देशाला अक्षरशः कोंडीत पकडले आहे. सतत पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) आकडेवारीनुसार, आतापर्यंत ८८३ नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर १,२०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

पावसाचा सर्वाधिक फटका खैबर-पख्तूनख्वाला

पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) प्रांत हा या आपत्तीचा सर्वाधिक बळी ठरला आहे. येथे एकट्याच ४८८ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३६० हून अधिक जखमी झाले आहेत. डोंगराळ भागात नद्यांना आलेल्या पुरामुळे घरे वाहून गेली, पूल कोसळले आणि डोंगरांवर भूस्खलनाची भीतीही वाढली आहे.

इतर प्रांतांतील भीषण हानी

  • सिंधमध्ये ५८ जणांचा बळी

  • गिलगिट-बाल्टिस्तान (POGB) मध्ये ४१ मृत्यू

  • पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये ३८ जणांचा मृत्यू

  • बलुचिस्तानमध्ये २६ मृत्यू

  • इस्लामाबादमध्ये ९ नागरिकांचा मृत्यू

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, फक्त बुधवारी रात्री उशिराच झालेल्या घटनांमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला. यात एक मुलगा इस्लामाबादमध्ये तर दुसरा पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपत्तीचा बळी ठरला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kim Ju Ae : अंतर्गत खेळी की पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान? मोठा मुलगा असतानाही किम जोंग उनची मुलगी होणार पुढची हुकूमशहा

शहरी पूराचा धोका वाढला

पाकिस्तान हवामान विभागाने (PMD) इशारा दिला आहे की वरच्या भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे लाहोर, गुजरांवाला, रावळपिंडी आणि इस्लामाबाद या शहरांत शहरी पूर येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

शेकडो गावे पाण्याखाली, शेतीचे प्रचंड नुकसान

पंजाबमधील गंडा सिंग वाला भागातील सतलज नदीची पाणीपातळी विक्रमी उंचीवर पोहोचली आहे. त्याचबरोबर चिनाब, रावी आणि सतलज नद्यांचा संगम असलेल्या पंजनाद परिसरात पुढील काही दिवसांत पूरस्थिती आणखी भीषण होऊ शकते. हवामान विभागाने इशारा दिला आहे की या पुरामुळे हजारो एकर शेती जमीन पाण्याखाली जाईल तसेच शेकडो गावे धोक्यात येतील.

आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार—

  • पंजाबच्या झांग जिल्ह्यातील २६१ गावे बुडाली

  • मुझफ्फरगड जिल्ह्यातील २४ गावे जलमय

  • पूरामुळे ६,००० हून अधिक गुरेढोरे मृत्युमुखी

  • देशभरात ९,२०० हून अधिक घरे उद्ध्वस्त

  • २४० पूल कोसळले आणि ६७० किमी रस्ते वाहून गेले

लोकांचे हाल : “जगण्यासाठी लढा”

पूरग्रस्त भागातील नागरिकांचे हाल अक्षरशः वर्णनातीत आहेत. हजारो कुटुंबे उघड्यावर रात्र काढत आहेत. महिला, लहान मुले आणि वयोवृद्धांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासनाने मोहिमा सुरू केल्या आहेत. मात्र वाहतूक मार्ग बंद झाल्यामुळे मदत कार्य हळूहळू होत आहे. एका पीडित शेतकऱ्याने स्थानिक माध्यमांशी बोलताना दुःख व्यक्त केले, “आमचं घर, आमचं शेत, आमची जनावरे… सगळं काही वाहून गेलं. आता पुढे कसं जगायचं हा प्रश्न आम्हाला भेडसावत आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Yudh Abhyas 2025 : ड्रोन विरुद्ध काउंटर-ड्रोन; हिमालयात धोका? अलास्कातील भारत-अमेरिका युद्ध सरावामागे ‘मोठं’ गुपित

पुढील २४ तास निर्णायक

एनडीएमएने इशारा दिला आहे की पुढील १२ ते २४ तास देशासाठी अधिक धोकादायक ठरू शकतात. अजूनही मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्यामुळे पूरस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती वर्तवली जात आहे. प्रशासनाकडून आपत्कालीन केंद्र कार्यरत ठेवण्यात आले आहे, तर स्थानिक सैन्य आणि पोलिस दल बचाव व मदतकार्यात गुंतले आहेत.

Web Title: Islamabad red alert pakistan rains update 883 people affected villages submerged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Flash floods
  • Floods in Punjab
  • pakistan
  • Pakistan News

संबंधित बातम्या

अर्रर्रर्र PCB ची घरातही इज्जत नाय! PSL मालकाने कायदेशीर नोटीस फाडून दिले थेट उत्तर; ‘या’ वादाचं नेमकं कारण काय?
1

अर्रर्रर्र PCB ची घरातही इज्जत नाय! PSL मालकाने कायदेशीर नोटीस फाडून दिले थेट उत्तर; ‘या’ वादाचं नेमकं कारण काय?

अरे देवा! टोमॅटो 600 रुपये किलो, किमतीत 400 टक्क्यांनी वाढ, 5000 कंटेनर अडकल्यामुळे पुरवठा निम्म्यावर
2

अरे देवा! टोमॅटो 600 रुपये किलो, किमतीत 400 टक्क्यांनी वाढ, 5000 कंटेनर अडकल्यामुळे पुरवठा निम्म्यावर

‘हिंमत असेल तर आमचा समाना करा’ ; दहशतवादी गट TTP च्या प्रमुखाचे असीम मुनीरला उघडपणे आव्हान
3

‘हिंमत असेल तर आमचा समाना करा’ ; दहशतवादी गट TTP च्या प्रमुखाचे असीम मुनीरला उघडपणे आव्हान

Jaish-E-Mohammad : जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी बनण्यासाठी करावा लागणार कोर्स; मसूद अझहरने तयार केला अभ्यासक्रम
4

Jaish-E-Mohammad : जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी बनण्यासाठी करावा लागणार कोर्स; मसूद अझहरने तयार केला अभ्यासक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.