Kim Ju Ae : अंतर्गत खेळी की पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान? मोठा मुलगा असतानाही किम जोंग उनची मुलगी होणार पुढची हुकूमशहा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Kim Ju-ae successor speculation : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन नेहमीच त्यांच्या गूढ आणि गूढतेने भरलेल्या निर्णयांसाठी ओळखले जातात. जगभरातील नेत्यांना चकित करणाऱ्या त्यांच्या हालचालींमध्ये अलीकडेच एक नवीन वळण दिसत आहे ते म्हणजे त्यांच्या मुलगी किम जो आह हिला उत्तराधिकारी म्हणून पुढे आणणे. हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे कारण किमचा एक मोठा मुलगाही अस्तित्वात आहे, तरीसुद्धा त्याला न बाजूला ठेवून मुलीला समोर आणले जात आहे.
दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेनुसार किम जोंग उन यांना तीन मुले आहेत एक मोठा मुलगा, मधली मुलगी किम जो आह आणि सर्वात धाकटा मुलगा, ज्याचे लिंग किंवा माहिती अधिकृतपणे अद्याप उघड नाही. या तिघांमध्ये केवळ किम जो आहच वारंवार वडिलांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. तिच्या उपस्थितीने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Tariff : भारतीय राजदूतांचा अमेरिकन कायदेकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण संवाद; काही मोठे घडणार याची चाहूल?
२०१० मध्ये जन्मलेली किम जो आह उत्तर कोरियामध्ये लहान वयातच चर्चेत आली. विशेष म्हणजे, तिने कोणत्याही शाळेत शिक्षण घेतलेले नाही. तिच्या शिक्षणाची जबाबदारी खासगी शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती आहे. तिला घोडेस्वारीची प्रचंड आवड आहे आणि तिच्या वडिलांप्रमाणेच पोहणे, स्कीइंग यांसारख्या खेळांतही ती रस दाखवते. किम जोंग उन यांच्यानंतर एकमेव कुटुंबातील व्यक्ती जिने ‘आदरणीय’ (Respected) अशी पदवी मिळवली आहे, ती म्हणजे किम जो आह. उत्तर कोरियामध्ये केवळ सर्वोच्च नेत्यालाच अशा प्रकारचा मान दिला जातो. त्यामुळे किम जो आहला मिळालेला हा दर्जा तिच्या भविष्यातील भूमिकेचा स्पष्ट संकेत मानला जात आहे.
१९४८ पासून किम कुटुंब पुरुषांच्या हातात सत्तेची धुरा सांभाळत आले आहे. परंतु आजच्या काळात बदलत्या राजकारणात किम जोंग उन आपल्या मुलीला पुढे करून हा पितृसत्ताक ठसा मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे विश्लेषक मानतात. याआधी त्यांनी आपल्या बहिणी किम यो जोंग हिला राजकारणात पुढे आणले होते, मात्र तिला मोठे पद कधीच मिळाले नाही.
किमचा मोठा मुलगा सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर ठेवण्यात आला आहे. त्याच्याबद्दलची माहिती गुप्त ठेवण्यात येत आहे. असे म्हटले जाते की किम आपल्या मुलाला प्रकाशझोतात आणल्यास सत्तासंघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. त्यामुळे तो धोका पत्करायचा न ठरवता त्यांनी मुलीला समोर आणले.
किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग गेल्या काही वर्षांत चर्चेत राहिली आहे. एकेकाळी तिलाही संभाव्य उत्तराधिकारी मानले जात होते. पण तिला अद्याप कुठलेही सर्वोच्च सरकारी पद मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर किम आपल्या मुलीला वारसा देऊन बहिणीच्या प्रभावाला मर्यादा आणू इच्छितात, असे तज्ज्ञ सांगतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Muslim Population : मुस्लिम देशांचा नेता बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुर्कीमध्ये लोक का सोडत आहेत इस्लाम?
बीजिंगच्या अलीकडील दौऱ्यात किम जो आह वडिलांसोबत दिसली आणि लगेचच ती पुन्हा चर्चेत आली. उत्तर कोरियामध्ये वारसाहक्काचा खेळ नेहमीच गूढ राहिला आहे, पण किम जो आहला मिळणारा विशेष मान, तिची सार्वजनिक उपस्थिती आणि वडिलांकडून मिळणारे प्रोत्साहन हे सर्व संकेत देतात की पुढील काही वर्षांत ती उत्तर कोरियाच्या सत्तासमीकरणातील प्रमुख चेहरा ठरू शकते. जगातील सर्वात गुप्त राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर कोरियामध्ये काय घडेल याची खात्री कोणी देऊ शकत नाही. मात्र आजच्या घडीला एवढे मात्र स्पष्ट आहे की किम जोंग उन आपल्या मुलीला उत्तराधिकारी म्हणून पुढे आणत आहेत, आणि हे पाऊल इतिहासाला नवा वळण देऊ शकते.