दिल्लीसह हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्येही पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसानंतर दिल्लीत यमुना नदीला पूर आला आहे. यमुना नदी ओसंडून वाहत असल्याने अनेक भागात घरे पाण्याखाली गेली आहेत.
Pakistan floods News: जून महिन्याच्या अखेरीपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत 883 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी आपल्या खासदार निधीतून 3.25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुरदासपूरमधील बांध दुरुस्तीसाठी आणि अमृतसरमधील मदतकार्यासाठी हा निधी वापरला जाईल.
पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुरावर बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. करीना कपूर आणि विकी कौशलसह अनेक कलाकारांनीही मदत करण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या रेड अलर्ट दरम्यान मंगळवारी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडला. उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.