फोटो सौजन्य सोशल मीडिया
हेब्रोन शहराजवळ लष्करी तपासणी नाका आहे . तिथे अचानक पॅलेस्टानी बंधूकधार्यांनी गोळीबार केला . या हल्ल्यात दोन इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला . तर बाकी तीन सैनिक पुरते जखमी झाले . यावर लगेच इस्रायली सैन्याने प्रतिहल्ला केला आणि ते दोन पॅलेस्टानी नागरिक मारले गेले .
या घटनेनंतर नेतन्याहू यांनी तातडीचे हेब्रोनला वेढा घालण्याचे आणि सगळ्या वेस्ट बँकमध्ये लॉकडाऊ लागू करण्याचे आदेश दिले . आता हा लॉकडाऊन किती कायदेशीर किंवा नैतिकतेला धरून आहे याबाबत जगभरात चर्चा सुरु झाल्या आहेत .
Breaking News: ये दोस्ती हम नही तोडेंगे ;रशियाचा पहिला डिझेलचा टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना
लष्करी कारवाईदरम्यान हेब्रोनमधील अल जालादा आणि ऐन देयर बहा परिसरात मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्यात आले . अनेक घरांची झाडाझडती घेण्यात आली असून काही घरे ,दुकाने आणि इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत . या कारवाईमुळे अंदाजे १२०० पॅलेस्टानी नागरिक आपली राहती घरे ,संसार सोडून सोडून दुसऱ्या मिळेल त्या सुरक्षित ठिकाणी गेले आहेत . या सगळ्या प्रकारामुळे युद्धामुळे निष्पाप माणसाला आपल्या हक्काच्या जागेवरून स्थलांतर करून उपेक्षित आयुष्य जगण्याची वेळ आली आहे . वय झालेली आणि लहान वय असलेल्या माणसांना याचा अधिकचा त्रास होत आहे .
World News : इराणच्या निशाण्यावर अमेरिकन अधिकारी ;अमेरिका ताबडतोब लागली कामाला
या सगळ्या प्रकारामुळे इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमधील अनेक शहरांचे महत्वाचे रस्ते आणि प्रवेशद्वार बंद केले असून , ठिकठिकाणी लष्करी तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत . तसेच प्रत्येक नागरिकांच्या सगळ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे . याचा परिणाम असा होत आहे कि , रुग्णालये ,शाळा व्यापार आणि रोजगारावर होत आहे . काही नागरिकांना उपचारांसाठीही बाहेर येता येत नसल्याने त्यांचीही पंचाईत झाली आहे . पॅलेस्टानी प्रशासनाने या कारवाईला सामूहिक शिक्षा असल्याचे म्हंटले आहे . तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांनी या घडणाऱ्या सगळ्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे .






