President Vladimir Putin has given proposal to Iran, to hand over its uranium to Russia
Israel Iran War News Marathi : मॉस्को: गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेला इराण-इस्रायल तणाव आता शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहे. अशातच आण्विक युद्धाचा देखील धोका वाढला आहे, या तणावात अमेरिका, चीन, रशिया, अशा अनेक देशांचा समावेशही होत आहे. नुकतेच अमेरिकेने इस्रायलला मोठी लष्करी मदत पाठवली आहे. तर दुसरीकडे रशियाने देखील इराणला मोठा ऑफऱ दिली आहे. या युद्धात पुतिन यांनी सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. पुतिन यांनी इराणकडे युरेनियमची मागणी केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रस्ताव अशा वेळी देण्यात आला आहे जेव्हा इराण-इस्रायलमधील तणाव अधिक तीव्र झाला आहे.
इस्रायलने इराणच्या अनेक आण्विक ठिकाणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्याचा इद्देश इराणला अणु शस्त्रे बनवण्यापासून रोखणे होते. इराणने अण्वस्त्र बनवली तर इस्रायलचे अस्तित्व धोक्यात येईल असेल म्हटले जात आहे. यामुळे इस्रायलने हल्ले केले आणि याच्या प्रत्युत्तरात इराण देखील हल्ले सुरु केली. यामुळे युद्ध तीव्र भडकले.
दरम्यान रशियाची यामध्ये एन्ट्री झाली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी इराणकडे युरेनियमच्या साठ्याची मागणी केली आहे. अमेरिका आणि रशियाची या युद्धात एन्ट्री अत्यंत धोकादायत मानली जात आहे.
क्रेमलिनने सोमवारी स्पष्ट केले की, त्यांनी खामेनींना दिलेला प्रस्वात अजूनही आहे. या वाईट परिस्थिती रशिया मध्यस्थी करण्यास तयार आहे. तज्ज्ञांच्या मते रशिया हा सर्वात मोठा अणु देश आहे. रशियाकडे ५ हजारांहून अधिक आण्विक शस्त्रे आहेत. अशातच रशियाला इराणकडून युरेनियमचा साठा मिळाल्यास रशिया आणखी आण्विक शस्त्रे तयार करले. तसेच इराणला देखील ही शस्त्रे पुरवेल. यामुळे अणु युद्धाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
परंतु याच वेळी युरोपियन युनियनने इराण-इस्रायल युद्धात रशियाची मध्यस्थी नाकारली आहे, पुतिन यांची शून्य विश्वासार्हता असल्याचे युरोपियन युनियनने म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना मध्यस्थ बनवण्याचा सल्ला दिला होता असे रशियाने म्हटले आहे, परंतु यावरही शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान इराणने अमेरिकेला इस्रायलला थांबवण्याचे म्हटले आहे. जर अमेरिकेने इस्रायलचे इराणवरील हल्ले थांबवले आणि इराणच्या सुरक्षेची हमी दिली तर इराणने रद्द केलेली अणु चर्चा पुन्हा सुरु होईल असे तेहरानने म्हटले आहे.