Israel-Iran War : एकेकाळी मजबूत संबंध असणाऱ्या दोन महाशक्ती एकमेकांचे कट्टर शत्रू कसे बनले? जाणून घ्या सविस्तर (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
Israel-Iran War News Marathi : सध्या मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायलमध्ये लष्करी संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. यामुळे दोघांचेही प्रचंड नुकसान होत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध होते. दोन्ही देशांमध्ये राजनैतिकच नव्हे, तर लष्करी आणि धोरणात्मक संबंध देखील अधिक मजबूत होते. परंतु गेल्या ४५ वर्षा दोन्ही देशांत कटुता निर्माण झाली. सध्या दोन्ही देश एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत.
दोन्ही देश एकमेकांना नष्ट करण्याच्या हट्टास पेटले आहे. परंतु या दोन महाशक्ती देशांतील मैत्रीत नेमकं असे काय घडले की दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले. आजा आपण हे जाणून घेऊयात. याआधी आपण दोन्ही देशांमधील संबंध कसे होते ते पाहूयात.
सोव्हिएत युनियनच्या काळात इस्रायलची १९४८ मध्ये स्वतंत्र देश म्हणून स्थापना झाली. त्या काळात इस्रायलच्या स्वतंत्र स्थापनेला अरबे देशांनी विरोध केली. अरब देशांनी इस्रायलवर हल्ला देखील केला होता. परंतु त्यावेळी इराणने इस्रायलला स्वतंत्र्य मान्यता दिली. त्यावेळेचे रझा शाह पहलवी यांचा मुला सझा साह यांनी इस्रायलला पाठिंबा दिला. त्यांना इराणला धर्मनिरपेक्ष आणि पाश्चात्य सुसंस्कृत राष्ट्र बनवले होते.
१९५० मध्ये इराणने इस्रायलला व्यावहारिक मान्यता दिली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दोन्ही देशांनी एकमेकांसाठी राजनैतिक दरवाजे खुले करत दूतावासांची स्थापना केली. तसेच इस्रायलला तुर्की, इथियोपिया या देशांचाही इराणसह पाठिंबा मिळला. परंतु अरब देशांना हे स्वीकार्य नव्हते. यामुळे अरब देश आणि इराणमधील संबंध बिघडले.
इस्रायल आणि इराणमदील हळूहळू वाढत गेली. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंधासह संरक्षण संबंध देखील प्रस्थापित होऊ लागले. तसे इराणची गुप्तचर संस्था SWAKLआणि इस्रायलची गुप्तरचर संस्था MOSSAD देखील संयुक्तपणे काम करु लागले. दोन्ही देशांमध्ये शस्त्रांचे प्रशिक्षणही सैनिकांना दिले जात होती. दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांनी इराकविरुद्ध कुर्ल बंडखोरांना मदत केली होती.
त्यानंतर १९६० च्या दशकात इराणला तेलाचा मोठा साठा सापडला. यावेळी इस्रायलला इराणकडूम नियमित तेल पुरवठा केला जाऊ लागला. इराणने इलात-अश्कलोन पाइपलाईनमध्ये गुंतवणूक केली. या पाइपलाइनद्वारे इस्रायला तेल वाहतूक केली जात होती. तर या बदल्यात इस्रायल इराणला शेती, सिंचन आणि शस्त्रास्त्र तंत्रज्ञांची मदत पुरवत होता.
१९७७ मध्ये दोन्ही देशांमध्ये प्रोजेक्ट फ्लॉवर नावाची गुप्त मिसाईल प्रोग्राम देखील सुरु केला. होता. याचा उद्देश अणुउर्जेवर चालणारी पाणबुडी तयार करणे आणि क्षेपणास्त्र विकसित करणे होता. विशेष म्हणजे अमेरिकेपासून हा करार लपवून ठेवण्यात आला होता. १९७९ शाह सल्तनत संपल्यावर हा प्रकल्प काही कारणास्तव रद्द करण्यात आला.
१९७९ मध्ये शाह सल्तनत संपुष्टात आली आणि इरानमध्ये इस्लामिक क्रांती प्रस्थापित झाली. यानंतर दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधामध्ये कटुता निर्माण झाली. नव्या सरकारने इस्रायलला शैतान म्हणून संबोधले. यानंतर हा तणाव वाढत गेला आणि दोन्ही देश एकमेकांचे १ नंबरचे कट्टर शत्रू बनले. पॅलेस्टाईनच्या मुद्दावरुन दोन्ही देश अनेकवेळा आमने-सामने आले आहे. तसेच हिजबुल्लाह, हमास सारख्या संघटनाना इराणने पाठिंबा दिला. यामुळे इस्रायलने याला विरोध करण्यास सुरुवात केली.