Israel Iran War Russian President Putin warns Israel not attack on their people in Iran
Israel Iran War news marathi: मॉस्को: सध्या इराण आणि इस्रायलमधील युद्ध तीव्र होत चालले आहे. इराणच्या अणु तळांवर इस्रालयने तीव्र हल्ले केले आहे. तर इराणने देखील प्रत्युत्तरात्मक कारवाई करत इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केल आहे. याच दरम्यान अमेरिका, चीन, रशिया या महाशक्ती देशांचाही यामध्ये सहभाग वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी खळबळजनक विधान केले आहे. यामुळे युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.
पुतिन यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या हल्ल्यांनी इराणच्या युरेनियम साठ्याला कोणतेही नुकसान झालेले नाही. इराणचे युरेनियमचे साठा त्यांच्या बंकरमध्ये सुरक्षित आहेत आणि त्याचे शुद्धकरण करण्याचे काम सुरुच आहेच. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
पत्रकारांशी बोलताना पुतिन यांनी, बोशेहरमध्ये २०० रशियन कामगार आहेत. त्यां सर्वांशी मी संपर्क साधला आहे. तसेच मी इस्रायलशी देखील संपर्क साधला असून बोशेरमधील रशियन लोकांवर कोणताही हल्ला न करण्याची ताकीद दिली आहे. इराणमध्ये रशियन लोकांवर इस्रायलने हल्ला न करण्याचे आश्वासन दिले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इस्रायलने आश्वासन न पाळल्याच याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असे पुतिन यांनी म्हटले आहे.
शिवाय इस्रायल हल्ल्यात नतांझ प्लांट उद्ध्वस्त झाल्याचा दावा देखील केला जात आहे.. नतांझ हा इराणच्या अणु तळांचे प्रमुख केंद्र आहे. इस्रायली संरक्षण दलाने हे अणुउर्जा केंद्र नष्ट केल्याचा दावा केला आहे. परतु इराणने त्यांचा नतांझ प्लांट सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
सध्या या युद्धात अमेरिका देखील सहभागी होत आहे. अमेरिकेने इस्रायलला लढाऊ विमाने आणि इतर लष्करी मदत पुरवण्यास सुरुवात केली आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील इराणवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. तर रशिया देखील इराण आणि इस्रायलमध्ये शांतता कररा घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. पुतिन यांनी युएई प्रमुखांशी संपर्क साधल्याचे म्हटले आहे.
याच दरम्यान इस्रायलने देखील इराणच्या लोकांना अरक हेवी वॉटर परिसर खाली करण्यास सांगितला आहे. इस्रायलकडून इराणच्या अरक अणु तळावर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.